महत्वाच्या बातम्या

 जिल्हयात २ हजार २५३ शेतकऱ्यांना १८ कोटीहून अधिक चुकारे अदा : पणन विभागाची माहिती


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : आधारभूत किंमत धान खरेदी योजना खरिप पणन हंगाम २०२३-२४ अंतर्गत शासन निर्णयानुसार भंडारा जिल्ह्यामध्ये धान २२४ धान केंद्रावरखरेदी सुरू आहे. 

ज्या धान खरेदी केंद्राच्या हुंड्या कार्यालयात जमा करण्यात आलेल्या आहे. त्यानुसार पाच डिसेंबर रोजी २ हजार २५३ शेतकऱ्यांचे  ८४ हजार ८५१.१९ क्विं. धानाचे १८ कोटी ५२ लाख ३० हजार १४७ रूपये चुकारे शेतकऱ्यांना अदा करण्यात आले. असल्याची माहिती  जिल्हा पणन अधिकारी सुधीर पाटील यांनी दिली आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos