अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
विशेष प्रतिनिधी /  अहेरी : 
सिरोंचा वरून आलापल्लीकडे  येत असतांना विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रक च्या धडकेत कुनघाडा येथील महादेव मंगाम (५१) हे   गंभीर जखमी झाले आहेत. . त्यांना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने चंद्रपूर येथे पुढील उपचारार्थ हलविले आहे. 
हेल्पिंग हँडस बहुउद्देेशिय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्रतीक मुधोळकर, सदस्य दिपक सूनतकर, अब्दुल रहेमान हजरत शेख यांनी रुग्णालयात जाऊन त्यांच्या नातेवाईकांना माहिती देऊन रुग्णवाहिकेसाठी संपर्क साधून   जखमी मंगाम यांना चंद्रपूर येथे हलविण्यास  मदत केली.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-07-24


Related Photos