राष्ट्रीय बाल हक्क समिती गडचिरोली जिल्ह्यात , १९ जुलै रोजी जनसुनावणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
नागपुर विभागातील सहाही जिल्हयातील बाल हक्क विषयक सुनावणी आयोगाचे सदस्य गडचिरोलीत दाखल झाले आहेत. समिती प्रमुख १९ जुलै रोजी सकाळी येणार आहेत. आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी व इतर विभाग प्रमुखांशी चर्चा केल्यानंतर समिती सदस्यांनी सामाजिक संस्थांशी बैठक घेतली.   गडचिरोली येथे १९ जुलै रोजी बाल हक्क व संरक्षणाबाबत विविध तक्रारींवर जनसुनावणी होणार आहे. 
गडचिरोली येथे होणारा हा भारतातील ९ वा बेंच (सुनावणी) आहे. यावेळी आयोगाचे सदस्यांनी सामाजिक संस्थांना तक्रारी दाखल करण्याचे आवाहन केले. यावेळी ते म्हणाले की कोणत्याही संस्थेचे नाव किंवा ओळख उघड न करता सुनावणी प्रक्रिया घेतली जाणार आहे. या दाखल झालेल्या आयोगाच्या गटामध्ये सुदीप चक्रवर्ती, शक्ती सिंह, अभिकर्ष त्यागी आणि निखिल कुमार हे सदस्य आहेत.
१८  जुलै रोजी दुपारी १  वा.  आयोगाचे अधिकारी बाल हक्क व संरक्षण विषयक संबंध येणाऱ्या विविध विभागप्रमुखांशी बैठक घेणार आहेत. यानंतर  १९ जुलै रोजी सकाळी ९ वा. आयोगाचे स्वागत जिल्हाणिकारी आवारात लेझिम पथकाद्वारे केले जाणार आहे. स्वागतानंतर लगेच आयोगाचे सदस्य पत्रकार परिषद घेणार आहेत. सकाळी ९ .४५  वा. होणाऱ्या पत्रकार परिषदेमध्ये आयेग आयोगाचा उद्देश माध्यामांना सांगणार आहेत तसेच माध्यमांच्या प्रश्नांना उत्तरे देणार आहेत. त्यानंतर सकाळी १० वाजता पासून जिल्हानिहाय सुनावणीला सुरूवात होणार आहे. राष्ट्रीय बाल हक्क व संरक्षण आयोगासमोर तक्रारी दाखल करण्याची सुरुवात नवीन नियोजन भवन, गडचिरोली येथे सकाळी ९  वाजता पासून सुरु होत आहे.  आजच्या बैठकीमध्ये सामाजिक संस्थांना तक्रारी दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले. त्यावेळी संस्थांच्या शंकांचे निरसन आयोगाच्या सदस्यांमार्फत करण्यात आले.  
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-07-17


Related Photos