महत्वाच्या बातम्या

 कोची विद्यापीठात चेंगराचेंगरी : चार विद्यार्थ्यांचा मृत्यू तर ४६ विद्यार्थी जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / केरळ : केरळच्या कोचीमधील कलामसेरी येथील पॅम्पसमध्ये टेक फेस्टदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत कोची युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. तर ४६ विद्यार्थी जखमी झाले आहेत.

पॅम्पसमधील ओपन एअर ऑडिटोरियममध्ये झालेल्या कार्यक्रमात शनिवारी सायंकाळी ७ च्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली.

कोची विद्यापीठात तीन दिवसीय टेक फेस्टचे आयोजन करण्यात आले होते. आज शनिवारी तिसरा दिवस होता. अचानक झालेल्या पावसात विद्यार्थ्यांनी स्टेजवर धाव घेतल्याने चेंगराचेंगरी झाल्याची माहिती आहे. गर्दीमुळे काही विद्यार्थी खाली पडले, त्यामुळे चेंगराचेंगरी होऊन यात चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. पार्श्वगायिका निकिता गांधी यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थी या ठिकाणी जमले होते. पीडितांमध्ये दोन मुले आणि दोन मुली आहेत. तर ४६ विद्यार्थी जखमी झाले आहेत. 

जखमी विद्यार्थ्यांना कळमसेरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले. दोन विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांसह डॉक्टरांचे पथक रुग्णालयात पोहोचले, अशी माहिती एर्नाकुलमचे जिल्हाधिकारी एनएसके उमेश यांनी दिली. चार विद्यार्थ्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. विद्यापीठाच्या इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये २ हजारांहून जास्त विद्यार्थी शिकत आहेत.





  Print






News - World




Related Photos