महत्वाच्या बातम्या

 गडचिरोली जिल्ह्यातील रस्ते, पुल व विकासाची कामे जलद गतीने पुर्ण करा


- आमदार डॉ. देवराव होळी यांचे मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग  नागपुर यांना निर्देश

- सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता यांच्यासोबत प्रमूख अधिकाऱ्यांची नागपूर येथे घेतली बैठक

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यामध्ये करण्यात येणाऱ्या कामांची गती संथ असून येणाऱ्या काळामध्ये सदर कामांची गती  वाढविण्याची आवश्यकता आहे. त्यामूळे सदर कामे जलद गतीने पूर्ण करण्यात यावे, असे निर्देश आमदार डॉ. देवराव होळी यांनी नागपूर येथे मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या कार्यालयात आयोजीत  बैठकीच्या प्रसंगी दिले.

यावेळी डी.एन. नंदनवार मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग नागपुर, गडचिरोली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता ठाकरे, कार्यकारी अभियंता साखरवाडे यांचेसह प्रमूख अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.





  Print






News - Nagpur




Related Photos