दंतेवाडात दोन नक्षल्यांचा खात्मा , एका महिलेचा समावेश


वृत्तसंस्था / रायपूर :  छत्तीसगड राज्यातील दंतेवाडात गुमीयापालजवळील जंगलात झालेल्या चकमकीत  दोन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. ठार करण्यात आलेल्या दोन नक्षलींमध्ये एका महिलेचा  समावेश आहे. आज रविवारी सकाळी ही चकमक झाली.
रायपूरपासून जवळपास ४०० किलोमीटर दूर असलेल्या गावात जेव्हा जिल्हा रिझर्व्ह गार्डचे पथक शोधमोहीमेवर निघाले होते, या दरम्यान ही चकमक झाली. विशेष म्हणजे ठार करण्यात आलेल्या दोन्ही नक्षलींवर प्रत्येकी पाच लाखांचे बक्षीस होते.  दंतेवाडाचे पोलिस अधीक्षक अभिषेक पल्लव यांनी याबाबत माहिती दिली की, नक्षलवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत तुफान गोळीबार झाला. यानंतर अनेक नक्षलवाद्यांनी जंगलात पळ देखील काढला. तर चकमकीदरम्यान ठार झालेल्या दोन नक्षलींचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला आहे. शिवाय घटनास्थळी ३०३ रायफल आणि एक पिस्तूल देखील आढळले आहे. ठार करण्यात आलेल्या नक्षलींची नावं देवा आणि ममगली उर्फ मुई अशी आहेत. ते नक्षलींच्या मलंगीर क्षेत्र समितीचे सक्रीय सदस्य होते व दोघांवरही प्रत्येकी पाच लाखांचे बक्षीस होते. याशिवाय कोसी नामक एका संशयीत महिलेसही अटक करण्यात आली आहे. परिसरात शोधमोहीम सुरू आहे.
  Print


News - World | Posted : 2019-07-14


Related Photos