रानडुक्कराच्या हल्ल्यात ४ जण जखमी, एक गंभीर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / आरमोरी :
  आरमोरी जवळच असलेल्या गणेश सदाशिव हेडावू यांच्या शेतामध्ये काम करीत असताना अचानक रानडुक्कराने हल्ला केला. या हल्ल्यात चार जण जखमी झाले असून एक गंभीर जखमी आहे. सदर घटना आज ११ जुलै रोजी  दुपारी २.३० ते ३ वाजताच्या ० च्या दरम्यान घडली.  
घटनेत विलास पांडुरंग नारनवरे (४७) रा.काळागोटा  हे गंभीर जखमी झाले आहेत . माधव विठोबा गजभिये (६५) रा.आरमोरी हे जखमी झाले. तर सायकलने जात असताना राजू हिरापुरे (४०) वर्षे रा.आरमोरी ,शंकर मेश्राम  (५५) रा.आरमोरी यांच्यावर रानडुक्कराने हल्ला केला . सदर घटना घडल्यावर सोमनकार रा.आरमोरी यांनी १०८ या क्रमांकावर संपर्क केला.  मात्र  प्रतिसाद मिळाला नाही. तेव्हा शेतमालक हेडावू यांनी जखमींना उपजिल्हा रुग्णालय आरमोरी येथे दाखल केले.  त्यात एक शेतमजूर गंभीर जखमी झाले आहे तर तीन किरकोळ जखमी झाले आहेत .जखमींवर उपजिल्हा रुंग्णालय आरमोरी येथे उपचार सुरू आहेत. वनविभागाने रानडुक्कराच्या हल्ल्यात जखमींना योग्य प्रकारे मदत करावी अशी मागणी जखमींच्या नातेवाईकांकडून केली जात आहे.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-07-11


Related Photos