गडचिरोली वनविभागात ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्याहस्ते वृक्षारोपण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
शहर प्रतिनिधी / गडचिरोली :
महाराष्ट्र  शासनाच्या महत्वाकांक्षी ५०  कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत ३३  कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमास १ जुलै पासून सुरूवात झाली आहे. आज ६ जुलै रोजी गडचिरोली वनविभागातील देवापूर कक्ष क्रमांक १७०  मध्ये ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्याहस्ते उद्घाटन करून बांबू रोपांची लागवड करून बांबू सेटमचे उद्घाटन करण्यात आले.
देवापूर कक्ष क्रमांक १७०  मध्ये बांबू रोपवन घेण्यात येत आहे. सदर बांबू रोपवनात वनविभागाद्वारे विविध प्रजातींच्या बांबूची लागवड करण्यात येत  आहे. बांबू सेटममुळे बांबूच्या विविध प्रजातींची सामान्य नागरीकांना ओळख होउन रोजगाराभिमूख वापर करण्यास मदत होईल. त्याप्रमाणे बांबू सेटम मुळे पर्यटकांना चालना मिळेल. या उद्देशाने बांबू सेटमची संकल्पना राबविण्यात येत आहे. उद्घाटनाआधी जनधन - वनधन रोपे विक्री केंद्राला समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांनी भेट दिली.
उद्घाटन कार्यक्रमाला ममता बाल सदन पुणे चे व्यवस्थापक दीपक गायकवाड, वनमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांचे खासगी जनसंपर्क अधिकारी मुकेश चौधरी , मनिष बोपटे, विनोद येवले, अविनाश गवळी, वैद्यराज एस.बी. तडसे, उपवनसंरक्षक डाॅ. कुमारस्वामी, सहाय्यक वनसंरक्षक एस.बी. भडके, क्षेत्रसहाय्यक पी.ए. जेनेकर, वनपाल कुंभारे, दुर्वे, बोडे, वनरक्षक कुळसंगे उपस्थित होते.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-07-06


Related Photos