गडचिरोली शहरातील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून केला नगरपरिषद व लोकप्रतिनिधींचा निषेध


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली
: शहरातील राधे बिल्डिंग , रेड्डीगोडाऊन , गोकुळनगर , चनकाईनगर , शिक्षक कॉलनी , बजाज शोरूम जवळ तसेच संपूर्ण शहरातील अंतर्गत रस्त्यांवर  वर्दळीच्या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत.  खड्डे दिवसेंदिवस मोठे होत आहेत. पावसाळा सुरू झाल्याने खड्ड्यांना पावसाच्या डबक्याचे    स्वरूप प्राप्त होत आहे.   पावसाळ्यात   खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे, असे असतांनाही नगर परिषद व लोकप्रतिनिधीनींचे दुर्लक्ष होत आहे. या बाबीकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघातर्फे  रस्त्यावरील खड्ड्यात वृक्षारोपण केले.  
  कित्येक दिवसापासून  खड्ड्यांचा  प्रश्न लोकप्रतिनिधी व नगर परिषद च्या निदर्शनास  आणून देण्यात आला. तरीही  दुर्लक्ष होत असल्याचा आरोप रुचित वांढरे यांनी केला आहे.        गडचिरोली शहर हे जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण आहे.    जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील गावातील नागरिकांना  काहींना काही  कामानिमित्त शहरात   वर्दळ असते.  त्याच प्रमाणे शहरात राष्ट्रीय महामार्गाचे काम चालू असून पुन्हा वर्दळ वाढलेली आहे आणि त्यातच रस्त्या वर पडलेल्या खड्ड्यांमुळे    लोकांचा  जीव धोक्यात आला  आहे .  त्यातच भर रस्त्यावर गुरे - ढोरे  रस्त्यावर बसून असतात.  यामुळे  नागरिकांना मोठा नाहक त्रास सहन करावा लागत असून याकडे दुर्लक्ष होत असल्याने आज राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघातर्फे रुचित वांढरे यांच्या नेतृत्वात गडचिरोली शहरातील खड्ड्यांमध्ये    वृक्षारोपण करून नगरपरिषद व लोकप्रतिनिधी चा निषेध करण्यात आला.   रस्त्यावरील खड्ड्यांची दृष्य जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीना व नगरसेवकांना दिसत असून हे गप्प का आहेत असा प्रश्न देखील रुचित वांढरे यांनी केला आहे.  यामुळेच  नागरिकांमध्ये नाराजीचा सुर उमटत आहे. खड्डेमय  रस्त्यांवरून गाडी चालवत नेल्याने वाहनधारकांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. वारंवार मागणी करूनही रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात आलेले नाहीत. रस्त्यावरील खड्ड्यांना तलावाचे स्वरूप आल्याने नागरिकांच्या जीविताशी  खेळले जात असल्याचे नागरिकांमध्ये बोलले जात आहे.    वृक्षारोपण करून निषेध करताना रुचित वांढरे सह राहुल भांडेकर , विकेश नैताम , चिकू भोपये , अभिजित भांडेकर , निशांत नैताम , आशु सोमनकर , सोमनाथ उईके , पराग बाळेकरमकर , प्रचित चौधरी , महेश टिपले , तुषार भदभुजे , सुशील मेश्राम , जितेंद्र शेंडे ,शंकर जगन्नाथ व मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-07-06


Related Photos