महत्वाच्या बातम्या

 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समाजासाठी प्रेरणादायी : खासदार रामदास तडस


- धम्मचक्र प्रवर्तन दिन, ग्रंथ समाप्ती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह परीसराचे सौदर्यीकरण भुमीपूजन सोहळा कार्यक्रम संपन्न

- मानकर बाजू कवाल व संच यवतमाळ, गायीका आशाताई मेश्राम अमरावती यांचा भिमगीत व बुध्द गीतांचा बहारदार कार्यक्रम झाला.

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / देवळी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सम्राट अशोकांनी विजयादशमी दिवसी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली असल्याने त्या दिवसाचे औचित्य साधत १९५६ साली विजयादशमीच्या मुहूर्तावर नागपूरमध्ये दीक्षाभूमीवर सुमारे ५ लाख अनुयायींसोबत बौद्ध धर्म स्वीकारला. आणि भारतामध्ये लुप्त झालेल्या बौद्ध धम्माचं चक्र गतिमान करत धम्मचक्र प्रवर्तन केले असल्याने त्या दिवसाला धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून महत्व आहे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जाती विरहित समाज व्यवस्था, सामाजिक न्याय व समता प्रथापित करण्यासाठी आपले आयुष्य खर्च केले. त्यांचे विचार आजही प्रेरणादायी असून माणुसकीला श्रेष्ठ बनविण्यासाठी बाबासाहेबांचे विचार सर्वांनी आत्मसात करावे असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी यावेळी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृह गौळ ता. देवळी येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन, ग्रंथ समाप्ती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह परीसराचे सौदर्यीकरण भुमीपूजन सोहळा कार्यक्रम खासदार रामदास तडस यांच्या उपस्थितीत संपन्न झाला, कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी सभापती विजय आगलावे, कार्यक्रमाला राजेश बकाने, सौ. विद्या भुजाडे, उपसरपंच मनोज नागपूरे, अमोल कसनारे, निलेश कसनारे, दशरथ भुजाडे, मारोजी लोहवे उपस्थित होते.

यावेळी माजी सभापती विजय आगलावे, राजेश बकाने यांनी समोयोचीत मार्गदर्शन केले.
यावेळी मानकर बाजू कवाल व संच यवतमाळ, गायीका आशाताई मेश्राम अमरावती यांचा भिमगीत व बुध्द गीतांचा बहारदार कार्यक्रम झाला.

कार्यक्रमाचे प्रास्तावीक मारोती लोहवे यांनी केले तर संचालन सिमा वाघमारे व उपस्थितांचे आभार विवेक मुन यांनी मानले, कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता भिमराव कांबळे, सौ. वनमाला मुन, श्रीमती त्रीवेनी वाघमारे, नारायण जामठे, अरविंद कांबळे, प्रल्हाद गोटे, पदमाकर कांबळे, हरीष गोटे, गजानन मोडक,धर्मपाल कांबळे, राहुल मोडक, सुमेध सलदर, विलास कांबळे, पुंडलीक जारुंडे, विजय जारुंउे, देवनंद थुलन, तुषार वाघमारे, राहुल थुल, रुपराव कांबळै, विश्वंभर कांबळे, रमेश डोगंरे, रामहरी मुन, भैय्यालाल मोडक, अरुण कांबळे व डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती गौळ यांनी प्रयत्न केले, कार्यक्रमाला मोठया संखेने गावकरी उपस्थित होते.





  Print






News - Wardha




Related Photos