महत्वाच्या बातम्या

 सरपंचपदासाठी १ हजार १८६ उमेदवार, सदस्यपदासाठी ६ हजार ८८२ उमेदवार : ५ नोव्हेंबरला ग्रामपंचायत निवडणूक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : नागपूर जिल्ह्यातील ३६१ ग्रामपंचायत मध्ये पाच नोव्हेंबरला ग्रामपंचायतची निवडणूक होणार आहे. ५ नोव्हेंबरलाच बारा ग्रामपंचायतीमध्ये पोटनिवडणुका होणार आहेत.आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सरपंच पदाचे १ हजार १८६ तर ६ हजार ८८२ उमेदवार सदस्यपदासाठी निवडणूक रिंगणात आहेत.

राज्यात २ हजार ३५९ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे. निवडणूक अंतिम टप्प्यात पोहोचली असून आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी नागपूर जिल्ह्यात १ हजार १८६ उमेदवार रिंगणात उरले आहेत. नागपूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक काटोल तालुक्यात १६० उमेदवार रिंगणात आहेत तर कामठी तालुक्यात सर्वात कमी ३१ उमेदवार रिंगणात आहेत. सदस्य पदासाठीही काटोलमध्ये सर्वाधिक ८७० उमेदवार आहेत. तर कामठीमध्ये १८४ उमेदवार आहेत.

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया १६ ते २० पार पडली. उमेदवारी अर्जाची छाननी २३ ऑक्टोबरला झाली. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख २५ ऑक्टोबर दुपारी तीन पर्यंत होती. २५ ऑक्टोबरलाच निवडणूक चिन्हांचे वाटप झाले. आता ५ नोव्हेंबरला सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान होईल. तर सहा नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos