महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


२७ ऑक्टोबर महत्वाच्या घटना

३१२ : ३१२ई.पूर्व : कॉन्स्टन्टाइन द ग्रेट यांना विजन ऑफ द क्रॉस प्राप्त झाले असे म्हटले जाते.

१९५८ : पाकिस्तानमध्ये जनरल अयुब खानने लश्करी उठाव करून राष्ट्राध्यक्ष इस्कंदर मिर्झा यांना पदच्युत केले.

१९६१ : मॉरिटानिया आणि मंगोलियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) मध्ये प्रवेश.

१९७१ : डेमॉक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो या देशाचे नाव बदलुन झैरे असे करण्यात आले.

१९८६ : युनायटेड किंगडमने आर्थिक बाजारपेठांवरील सर्व निर्बंध काढुन टाकले.

१९९१ : तुर्कमेनिस्तानला रशियापासुन स्वातंत्र्य मिळाले.

२७ ऑक्टोबर जन्म

१८५८ : अमेरिकेचे २६ वे राष्ट्राध्यक्ष, नोबेल पारितोषिक विजेते थिओडोर रुझव्हेल्ट यांचा जन्म. (मृत्यू: ६ जानेवारी १९१९)

१८७४ : कवी भास्कर रामचंद्र तथा भा. रा. तांबे यांचा जन्म. (मृत्यू: ७ डिसेंबर १९४१)

१९०४ : स्वातंत्र्यसेनानी व क्रांतिकारक जतिंद्रनाथ तथा जतिन दास यांचा जन्म. (मृत्यू: १३ सप्टेंबर १९२९)

१९२० : भारताचे १०वे राष्ट्रपती के. आर. नारायणन यांचा जन्म. (मृत्यू: ९ नोव्हेंबर २००५)

१९२३ : उद्योगपती अरविंद मफतलाल यांचा जन्म. (मृत्यू: ३० आक्टोबर २०११)

१९४७ : समाजसेवक डॉ. विकास आमटे यांचा जन्म.

१९५४ : पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल यांचा जन्म.

१९६४ : ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू मार्क टेलर यांचा जन्म.

१९७६ : भारतीय-अमेरिकन शेफ आणि लेखक मनीत चौहान यांचा जन्म.

१९७७ : श्रीलंकेचा क्रिकेटपटू कुमार संगकारा यांचा जन्म.

१९८४ : भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू इरफान पठाण यांचा जन्म.

२७ ऑक्टोबर मृत्यू

१६०५ : तिसरा मुघल सम्राट अकबर यांचे निधन. (जन्म: १४ ऑक्टोबर १५४२)

१७९५ : पेशवा सवाई माधवराव यांचे निधन. (जन्म: १८ एप्रिल १७७४)

१९३७ : किराणा घराण्याचे संस्थापक व सवाई गंधर्वांचे गुरु संगीतरत्‍न उस्ताद अब्दुल करीम खाँ यांचे निधन. (जन्म: ११ नोव्हेंबर १८७२)

१९६४ : सहकारी चळवळीचे प्रवर्तक वैकुंठ मेहता यांचे निधन. (जन्म: २६ ऑक्टोबर १८९१)

१९७४ : गणिती चक्रवर्ती रामानुजम यांचे निधन. (जन्म: ९ जानेवारी १९३८)

१९८७ : क्रिकेटपटू, क्रिकेट समालोचक, उद्योगपती व समाजसेवक विजय मर्चंट यांचे निधन. (जन्म: १२ ऑक्टोबर १९११)

२००१ : हिन्दी व बंगाली चित्रपटसृष्टीतील अभिनेता प्रदीप कुमार यांचे निधन. (जन्म: ४ जानेवारी १९२५)

२००१ : बालसाहित्यकार, विज्ञानकथाकार, फास्टर फेणे आणि बिपीन बुकलवार या पात्रांचे जनक भास्कर रामचंद्र तथा भा. रा. भागवत यांचे निधन. (जन्म: ३१ मे १९१०)

२००७ : हिंदी चित्रपटांतील चरित्र अभिनेता सत्येन कप्पू यांचे निधन.

२०१५ : भारतीय औषधीशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक रानजीत रॉय चौधरी यांचे निधन. (जन्म: ४ नोव्हेंबर १९३०)





  Print






News - todayspecialdays




Related Photos