उसेगाव येथे भव्य विर बाबुराव सेडमाके कृषी मेळावा


- शेतकरी बांधवांकरिता विविध योजनांची माहिती 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / देसाईगंज :
गडचिरोली जिल्हा पोलिस प्रशासना अंतर्गत पोलीस स्टेशन देसाईगंजच्या  वतीने जनतेत जनजागृती व्हावी तसेच शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती जनतेस मिळावी याकरिता आज ३० जून रोजी    उसेगावं येथील जि.प.शाळेच्या पटांगणावर भव्य विर बाबुराव सेडमाके कृषी मेळाव्याचे आयोजन केले होते.
 यावेळी कार्यक्रमाला कार्यक्रमाच्या अदभयक्षस्थानी   पोलीस निरीक्षक प्रदीप लांडे  होते.  उद्घाटन  प्रा.दुपारे मूनघाटे महाविद्यालय धानोरा यांच्याहस्ते करण्या आले.  प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ अधिवक्ता ॲड. संजय गुरू  देसाईगंज,  प्रणय कोसे ग्रामीण रुग्णालय देसाईगंज , मुक्तीपथ तालुका संघटिक भारती उपाध्ये , नायब तहसीलदार मेश्राम , डी.डी.घोनमोडे जि.प.शाळा उसेगाव , डॉ.आय.एन.टूटेजा देसाईगंज , मा.वाय.पी.रणदिवे तालुका कृषी अधिकारी देसाईगंज, मारोती बगमारे सरपंच शिवराजपुर , पांडुरंग पा.बोरकर , संजय पत्रे , सुरेश करकाटे , दिवाकर बारसागडे मंचकावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी ॲड.संजय गुरू यांच्या हस्ते कार्यक्रमाचे द्विप प्रज्वलन करून विर बाबुराव सेडमाके व विद्येची देवता देवी सरस्वती मातेच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी बोलताना ॲड. गुरू यांनी कायदेविषयक मार्गदर्शन केले.  उपस्थित जनतेस महत्वाची माहिती दिली. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष पोलीस निरीक्षक प्रदीप लांडे   म्हणाले की येणाऱ्या काही दिवसातच देसाईगंज शहरातून व तालुक्यातील ३२ गावांमधून अवैध धंद्यांवर लवकरच आळा बसवू व उपस्थित नागरिकांना व्यसनामुळे होणारे दुष्परिणाम व त्यातून होणाऱ्या अनेक रोगांबदद्दल मार्गदर्शन केले.
  सर्वप्रथम कार्यक्रमाचे प्रास्ताविक म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) बावनकर  यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तर कार्यक्रमाचे संचालन देवेवार यांनी केले.   मेळाव्याचे आकर्षण म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम , रोजगार , कृषी विषयक मार्गदर्शन , शासनातर्फे जनविकासाकरिता राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती, रांगोळी स्पर्धा व सांस्कृतिक घेण्यात आली व कार्यक्रमाच्या शेवटी बक्षीस वितरण करण्यात आले.
 यावेळी कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता देसाईगंज पोलिस विभागातर्फे पोलीस उपनिरीक्षक हर्षल नगरकर , बिट अंमलदार सयाम , करकाडे , मनोहर गोटा , सीताराम लांजेवार यांनी अथक प्रयत्न केले.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-06-30


Related Photos