महत्वाच्या बातम्या

 पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा उद्या वर्धा जिल्हा दौरा कार्यक्रम


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार उद्या १७ ऑक्टोबर रोजी वर्धा जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम खालील प्रमाणे आहे.

१७ ऑक्टोंबर रोजी सकाळी १० वाजता चंद्रपूर येथून वर्धेकडे प्रयाण करतील. दुपारी १२ वाजता वर्धा तालुक्यातील मदनी येथे आयोजित विविध विकासकामांच्या भुमीपूजन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 1 वाजता सेवाग्राम चौक येथे स्वागत कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी १.३० महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास हारअर्पण कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी २ ते ४ वाजेपर्यंत शासकीय विश्रामगृह येथे राखीव. सायंकाळी ४ वाजता जिल्हा परिषद सभागृह येथे शासकीय अधिका-यांसमवेत  विविध विभागाच्या आढावा बैठकीस उपस्थिती.

सायंकाळी ७ वाजता बजरंग व्यायामशाळा तडस गार्डन धुनीवाले मठ चौक येथे आयोजित तरंग गरबा उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. रात्री 8 वाजता प्रमोद राऊत व रात्री ८.३०  प्रविण धोपटे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देतील. रात्री ९ वाजता मोटारीने चंद्रपूरकडे प्रयाण करतील.





  Print






News - Wardha




Related Photos