महत्वाच्या बातम्या

 सुरक्षा गार्ड व सुपरवायझर भरती रोजगार मेळावा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : कॅप्सटन फॅसिलीटीस मॅनेजमेंट लिमिटेड कुकटपल्ली हैदराबादच्यावतीने २५ ऑक्टोंबर ते ४ नोव्हेंबर या कालावधीत जिल्ह्यात तालुका स्तरावर पंचायत समितीच्या सभागृहात सुरक्षा गार्ड व सुपरवाईजर या पदासाठी भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याचा उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

२५ ऑक्टोंबर रोजी आर्वी येथे, २६ ऑक्टोंबर रोजी आष्टी, २७ ऑक्टोंबर रोजी देवळी, ३० ऑक्टोंबर रोजी हिंगणघाट, ३१ ऑक्टोंबर रोजी कारंजा, १ नोव्हेंबर रोजी समुद्रपूर, २ नोव्हेंबर रोजी सेलू व ४ नोव्हेंबर रोजी वर्धा येथे सकाळी ११ ते ३ वाजतापर्यंत भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. भरती मेळाव्यात सुरक्षा गार्ड व सुपरवाईजर या पदासाठी उमेदवार इयत्ता ८ वी पास ते १० नापास असावा, उंची १६५ सेमी व वय १८ ते 35३५ वर्ष असावे.

भरती मेळाव्यास येतांना मुळ शैक्षणिक पात्रतेबाबचे प्रमाणपत्र, आधारकार्ड व बँक पासबुकची छायांकित प्रत सोबत आणावी, असे  जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्तांनी कळविले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos