महत्वाच्या बातम्या

 दीक्षाभूमीवर आजपासून दोन दिवसीय कार्यक्रम


- ६७ व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळ्याचे आज उद्घाटन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : दरवर्षी येथील दीक्षाभूमीवर दोन दिवसीय धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळ्याचे आयोजन केले जाते. यावर्षी १५ ऑक्टोबरपासून ६७ व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळ्याला प्रारंभ होत असून, दीक्षाभूमीवर अनुयायांच्याच स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. दोन दिवसीय सोहळ्यात जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो अनुयायी दीक्षाभूमीवर येत असून दीक्षाभूमीवर निळाई अवतरणार आहे.

चंद्रपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर १५ व १६ ऑक्टोबर रोजी ६७ व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या समारंभात विविध क्षेत्रातील अभ्यासक व मान्यवर सहभागी होत आहेत. १५ ऑक्टोबरला सायंकाळी ४ वाजता विश्वशांती, बंधूत्व प्रेरित वाहनासह मिरवणूक निघणार आहे. सायंकाळी ४.३० वाजता आयोजित धम्म ध्वजारोहण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटीचे अध्यक्ष अरुण घोटेकर राहतील. तर, प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी विनय गौडा, जिल्हा पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी उपस्थित राहणार आहेत.

तर सायंकाळी ४.४० वाजता धम्मज्योत प्रज्वलन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भदन्त धम्ममेत्ता घोष (चंद्रपूर) राहतील. तर, विशेष अतिथी म्हणून भदन्त ज्ञानज्योती महारथवीर (चिमूर), भदन्त सारिपुत्त ((म्यानमार, ब्रम्हदेश), तर प्रमुख अतिथी म्हणून जि. प. मुख्य कार्यपालन अधिकारी विवेक जॉन्सन, मनपा आयुक्त विपीन पालीवाल उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी ४.५० वाजता सामुहिक बुद्धवंदना, स्फुर्तीगाण, अतिथीचे स्वागत आणि धम्म प्रवचन आणि रात्री ८ वाजता जागर समतेचा बुद्ध भिम गीतांचा कार्यक्रम जाधव सिस्टर्स आणि संच नागपूर सदर करणार आहेत. 

१६ ऑक्टोबरला सकाळी १० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाला अभिवादन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थिधातूकलश व सैनिक दलाचे पथसंचलनासह मिरवणूक पवित्र दीक्षाभूमिकडे प्रस्थान करेल. सकाळी ११ वाजता बुध्दधम्म आणि आधुनिक विज्ञान या विषयावर परिसंवाद होईल. दुपारी १.३० वाजता सामुहिक बुद्धवंदना आणि धम्मप्रवचन कार्यक्रम होईल. अध्यक्षस्थानी भदन्त आर्य नागार्जुन सुरेई ससाई राहतील.

सायंकाळी ५ वाजता आयोजित मुख्य समारंभाच्या अध्यक्षस्थानी अरुण घोटेकर राहतील. तर, प्रमुख अतिथी म्हणून भदन्त डॉ. वण्णासामी (अरुणाचल प्रदेश), भदन्त सारिपुत्त (म्यानमार, ब्रम्हदेश), विशेष अतिथी म्हणून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार, विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, आ. अ‍ॅड. अभिजीत वंजारी, उत्तरप्रदेश पर्यटन विभागाचे सचिव मुकेश मेश्राम, आ. सुधाकर अडबाले, आ. किशोर जोरगेवार, आ. सुभाष धोटे डॉ. प्रदीप आगलावे यांची उपस्थित राहणार आहेत. रात्री ९ वाजता नागपूर येथील आकांक्षा नगरकर आणि संच बुध्द भीम गीतांचा कार्यक्रम सादर करतील. 





  Print






News - Chandrapur




Related Photos