जगन मोहन रेड्डी सरकारने चंद्रबाबू नायडू यांचा अमरावती येथील प्रजा वेदिका बंगला घेतला ताब्यात, पाडण्याचे आदेश


वृत्तसंस्था / अमरावती :  आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी अमरावतीमधील माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू  यांची प्रजा वेदिका इमारत पाडण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री  जगन मोहन रेड्डी यांच्या आदेशानुसार मंगळवारपासून ही इमारत पाडण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वीच चंद्रबाबू नायडू यांनी मुख्यमंत्री रेड्डी यांना प्रजा वेदिका इमारत विरोधी पक्षनेत्याला द्यावी अशी विनंती केली होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी त्यांची ही मागणी धुडकावून लावली होती.
राज्य सरकारने शनिवारी प्रजा वेदिका बंगला ताब्यात घेतला होता. त्यानंतर टीडीपीने याला द्वेषाचे राजकारण म्हटले होते. विरोधकांचा आरोप आहे की, सरकारने माजी मुख्यमंत्र्यांविषयी सद्भावना दाखवली नाही. तसेच त्यांचे सामान घराच्या बाहेर फेकून दिले.
टीडीपी सरकारने प्रजा वेदिका इमारतीची निर्मिती आंध्रप्रदेश राजधानी क्षेत्र विकास प्राधिकरणच्या माध्यमातून तत्कालीन मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान म्हणून करण्यात आले होती. पाच कोटी रुपये खर्चून निर्माण केलेल्या प्रजा वेदिका बंगल्यातून चंद्रबाबू नायडू कार्यालयीन कामकाजासह पक्षाचे काम देखील पाहात होते. या महिन्याच्या सुरुवातीला नायडू यांनी ही इमारत विरोधीपक्ष नेत्याला द्यावी ही विनंती केली होती. मात्र सरकारने त्यांची विनंती फेटाळून लावली.   Print


News - World | Posted : 2019-06-24


Related Photos