महत्वाच्या बातम्या

 लसीपासून वंचित राहिलेल्या बालकांचे प्राधान्याने लसीकरण करा : जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर 


- ९ ऑक्टोबरपासून मिशन इंद्रधनुष्यची तिसरी फेरी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : मिशन इंद्रधनुष्य ५.० मोहिमेची तिसरी फेरी ९ ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. यात ९  ते १४ ऑक्टोबर या कालावधीमध्ये जिल्ह्यातील नागरिकांनी घरातील लसीकरणापासून वंचित राहिलेल्या बालकांचे प्राधान्याने लसीकरण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.  

जिल्ह्यातील ग्रामिण भागातील शुन्य ते दोन वर्ष वयोगटातील ८ हजार २६८ बालके व दोन ते पाच वयोगटातील ८७० बालकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. त्यासोबतच १ हजार २० गरोदर मातांचे सुध्दा लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी ६६१ विशेष लसीकरण सत्रांचे नियोजन करण्यात आले आहे, अशी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांनी दिली आहे.

जिल्ह्यात विशेष मिशन  इंद्रधनुष्य ५.० कार्यक्रम हाती घेतला आहे. आता तिसरा टप्पा ९ ते १४ ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे. दोन ते पाच वर्ष वयोगटातील ज्या बालकांचा गोवर रुबेला लसीचा पहिला व दुसरा डोस राहिला असेल तसेच डीपीटी व ओरल पोलिओ लसीचा बूस्टर डोस राहिला असेल त्यांचे लसीकरण करणे, गर्भवती महिलांना लसीकरण करणे, ६ ऑगस्ट २०१८ किंवा त्यानंतर जन्मलेल्या बालकाचा यामध्ये समावेश असल्याची माहिती जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ. रेवती साबळे यांनी दिली.





  Print






News - Nagpur




Related Photos