रिलायन्स कंपनीचे बाजार भांडवल घटल्याने अनिल अंबानी अब्जाधीशांच्या सूचीतून बाहेर


वृत्तसंस्था / नवी दिल्ली : रिलायन्स एडीएजी समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी आता अब्जाधीशांच्या सूचीतून बाहेर पडले आहेत. २००८ मध्ये जगभरात सर्वांत श्रीमतांच्या सूचीत अनिल अंबानी सहाव्या स्थानावर होते. सोमवारी शेअर बाजारातील व्यवहारांच्या अखेरीस अनिल अंबानी यांच्या कंपनीचे बाजार भांडवल कमालीचे घटल्याने त्यांनी अब्जाधीश हे बिरूद गमावले. 
 सोमवारच्या व्यवहाराअंती त्यांच्या ६ कंपन्यांचे बाजार भांडवल ९ हजार १९६ कोटींवर स्थिरावले. अनिल अंबानी यांची एकूण संपत्ती आता १ अब्ज डॉलरपेक्षा कमी झाली आहे. हा आकडा आणखी कमी होण्याची शक्यता आहे. या समूहाची संपत्ती वाढत्या कर्जामुळे कमी होत गेली.   Print


News - World | Posted : 2019-06-19


Related Photos