आष्टी पोलीस ठाण्याच्या वतीने शेतकऱ्यांना युरिया खताचे वाटप


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  आष्टी  :
येथील पोलिस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या ५४ गावातील काही १००   अल्पभूधारक शेतकऱ्यांना युरिया   खत  प्रत्येकी दोन बॅग वितरित करण्यात आले . हा उपक्रम जिल्ह्यातील एकमेव असून आष्टी  पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल यांच्या संकल्पनेतून व आष्टी पोलीस ठाण्याच्या सर्व पोलिस कर्मचाऱ्यांनी  आपल्या मागील महिन्याच्या पगारातून मदतीचा हात समोर केला आहे. 
पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी   युरिया खत घेण्याकरिता पैसे गोळा केले आणि प्रत्येकी एका शेतकऱ्याला दोन बॅग देण्याचे ठरविण्यात आले आणि आज १४ जून रोजी   पोलीस ठाण्यात  युरिया खत वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला .  या वेळी मंचावर शहीद पोलीस स्वर्गीय प्रकाश गोंगले यांची आई कारूबाई गोंगले हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.  प्रमुख अतिथी म्हणून व मुख्य मार्गदर्शक आष्टी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल, पोलीस उपनीरीक्षक जयदीप पाटील, आष्टीतील पत्रकार गणेश शिंगाडे , पोलीस मित्र आलोक मंडल व आष्टी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेले ५४ गावातील पोलीस पाटील यावेळेस उपस्थित होते . एका गावातील पाच शेतकरी ज्यांची हलाखीची परिस्थिती आहे अशा शेतकऱ्यांना आज कारुबाई  गोंगले यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.  या उपक्रमाबद्दल आष्टी वासियांच्या च्या वतीने सर्व  पोलीस कर्मचार्‍यांचे ज्या शेतकऱ्यांनी युरिया खत नेले त्यांनी व सुज्ञ नागरिकांनी पोलिसांचे आभार व्यक्त केले आहे . यावेळी   पोलीस उप निरीक्षक जयदीप पाटील यांनी शेतीविषयी  मार्गदर्शन  केले आणि शेती उपयोगी माहिती दिली .  पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल यांनी सुद्धा शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-06-14


Related Photos