केरळ एक्सप्रेसमध्ये गुदमरल्याने चार प्रवाशांचा मृत्यू


वृत्तसंस्था / नवी दिल्ली :  दिल्लीहून झाशीला जाणाऱ्या केरळ एक्सप्रेसमध्ये  भयंकर उकाडा आणि गुदमरल्याने चार प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.   दरम्यान या चारही प्रवाशांचे मृतदेह झाशी स्टेशनवर उतरवण्यात आले आहेत. आग्रा येथून ६८ जणांचा एक गट कोईम्बतूरला जात होता, त्यात या चार प्रवाशांचा समावेश होता.
जून महिना सुरू झाला तरीही देशभरात उष्णतेची लाट मात्र कायम आहे. अजून एक आठवडा उत्तरेकडच्या राज्यातील नागरिकांची उकाड्यापासून सुटका होणं कठीण आहे असं हवामान खात्याने म्हटले आहे. मान्सून केऱळमध्ये पोहचला असला तरी त्याचा उत्तरेकडचा प्रवास अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे. देशातील अनेक भागात तापमानाने कमाल मर्यादा ओलांडली असून पारा ४५ ते ५० डिग्री सेल्सियसवर पोहचला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्रातील विदर्भ, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमधील किनारी पट्टीलगतच्या भागात तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.  Print


News - World | Posted : 2019-06-11


Related Photos