दारूविक्रेत्याकडून ९७ हजारांचा मुद्देमाल जप्त, आरमोरी पोलिसांची कारवाई


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / आरमोरी :
तालुक्यातील ठाणेगाव यथे अवैध दारूविक्रेता अजय दादाजी राउत (३४) रा. अंतरगाव या दारूतस्कराला ताब्यात घेउन आरमोरी पोलिसांनी ९७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर कारवाई काल ९  जून रोजी रात्रीच्या सुमारास करण्यात आली.
पोलिसांना ठाणेगाव येथे दारूतस्करी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून अजय राउत याला ताब्यात घेतले. यावेळी सोबत असलेले प्रतिक राजु भुरसे (१९), किसन मेश्राम (३९) आणि आशिष अशोक लोथे (२०) तिघेही रा. ठाणेगाव हे फरार झाले. आरोपी दुचाकीद्वारे देशी दारूच्या ७०० नग शिशा वाहतूक करीत असल्याचे आढळून आले. ५५ हजार रूपये किमतीची दुचाकी व ४२ हजार रूपये किमतीची दारू जप्त करण्यात आली आहे. आरोपींवर आरमोरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अजय राउत याला चार दिवसांची पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे तर फरार आरोपींचा शोध सुरू आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक चिल्लावार यांच्या मार्गदर्शनात नापोशि निलेश भाकरे करीत आहेत.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-06-10


Related Photos