महत्वाच्या बातम्या

 भंडारा प्रधान डाकघरात १ ऑक्टोबरपासून आधार सेवा सकाळी ८ वाजेपासून उपलब्ध - नागरिकांना मिळणार दिलासा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : येथील प्रधान डाकघरात आधार नोंदणी आणि दुरुस्तीसाठी येणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी टपाल विभागाने एक महत्त्वाचा व दिलासादायक निर्णय घेतला आहे. येत्या १ ऑक्टोबर २०२६ पासून डाकघरातील आधार सेवा केंद्र आता सकाळी ८ वाजताच सुरू होणार असून, ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत नागरिकांच्या सेवेसाठी खुले राहील. या नव्या वेळेमुळे नोकरदार, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय टळणार आहे.

मिळणाऱ्या सुविधा -

- नवीन आधार नोंदणी

- नाव / पत्ता / जन्मतारखेमध्ये दुरुस्ती

- मोबाईल नंबर आणि बायोमेट्रिक्स अपडेट

नागरिकांना वेळेत आणि सुलभ पद्धतीने सेवा मिळावी यासाठी टपाल विभाग सातत्याने उपाययोजना करत आहे. नागरिकांनी आवश्यक कागदपत्रे सोबत आणून विस्तारित वेळेचा लाभ घ्यावा.”असे पोस्टमास्टर  प्रमोद भुरे यांनी कळविले आहे.





  Print






Related Photos