महत्वाच्या बातम्या

 २३ सप्टेंबरला एडिप योजना अंतर्गत दिव्यांगांना निःशुल्क सहायक उपकरण वितरण शिबीर


- सामाजिक न्याय और अधिकारिता राज्यमंत्री, रामदास आठवले यांच्या उपस्थितीत होणार दिव्यांगांना साहित्य वाटप

- वर्धा लोकसभा क्षेत्रातील प्रत्येक तालुक्यात होणार साहित्य वाटप

- वर्धा लोकसभा क्षेत्रातील एकुण ४ हजार ७८ दिव्यांगांना ५ हजार १०७ सहाय्यक उपकराचे वाटप होणार.

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : भारत सरकार, सामाजिक न्याय और अधिकारिता मंत्रालय, दिव्यांगजन सशक्तिकरण विभाग, सामाजिक अधिकारिता शिविर एडिप योजनान्तर्गत दिव्यांगांना निःशुल्क सहायक उपकरण वितरण शिबीर कार्यक्रम २३ सप्टेंबर २०२३ सकाळी ११ वा. चरखा गृह, सेवाग्राम रोड, हुतात्मा स्मारक समोर, सेवाग्राम वर्धा येथे सामाजिक न्याय आणि अधिकारिता राज्यमंत्री, रामदास आठवले यांच्या शुभहस्ते व उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य व पालकमंत्री वर्धा जिला देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत वर्धा लोकसभा मतदार क्षेत्राचे खासदार रामदास तडस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. 

कार्यक्रमाला आमदार डॉ. रामदास आंबटकर, आमदार अभिजित वंजारी, आमदर सुधाकर अडवाले, आमदार रणजित कांबळे, आमदार दादाराव केचे, आमदार समीर कुणावार, आमदार. डॉ. पंकज भोयर, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे उपस्थित राहणार आहे.

वर्धा लोकसभा मतदार क्षेत्राचे खासदार रामदास तडस यांच्या प्रयत्नातून भारत सरकारच्या एडीआयपी योजने अंतर्गत दिव्यांगांना मोफत साहित्य दिले जाणार आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग भारत सरकारच्या भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (एलिम्को) जबलपूर व जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्यात १४ मार्च ते २१ मार्च २०२३ दरम्यान तालुका स्तरावर पंचायत समिती निहाय दिव्यांगांचे विशेष तपासणी शिबीरे घेण्यात आली होती. त्यात त्यांचे शारीरिक मोजमाप व तपासणी करुन आवश्यक साहित्य ठरविण्यात आले होते. जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी प्राजक्ता इंगळे व टीम तसेच खा. रामदास तडस यांचे स्वीय सहाय्यक विपीन पिसे व भाजपा दिव्यांग आघाडीचे संजय जाधव यांच्या समन्वयाने केलेल्या प्रयत्नातून एकूण ३ हजार ४७८ दिव्यांगांच्या नोंदणी करण्यात आलेली असुन दिव्यांगाच्या सोईकरिता तालुकास्तरावर दिव्यांगांना निःशुल्क सहायक उपकरण वाटप करण्यात येणार आहे.

कायक्रमाला उपमुख्यमंत्री यांचे विशेष कार्यकारी अधिकारी सुमीत वानखेडे, भाजपा जिल्हाध्यक्ष सुनिल गफाट, माजी सभापती विजय आगलावे दिव्यांग आघाडी अध्यक्ष संजय जाधव व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे.

जिल्हा प्रशासना तर्फे चोख व्यवस्था करण्यात आली असून जिल्हाधिकारी राहुल कर्डीले व जिल्हा परिषदेचे सीईओ रोहन घुगे आढावा बैठका घेऊन बारकाईने लक्ष ठेऊन आहे. वर्धा नगर परिषदेचे सीईओ राजेश भगत यांनी कार्यक्रमाच्या दिवशी सकाळी १० वाजता पासून नगर परिषद कार्यालयातून जाण्यायेण्यासाठी शहरातील दिव्यांग लाभार्थ्यांना गाड्यांची सुविधा उपलब्ध राहणार आहे. तसेच वर्धा पंचायत समितीचे बिडीओ संजय पाटील यांनी आपल्या क्षेत्रातील ७५ ग्रामपंचयातीमधून दिव्यांग लाभार्थ्यांना येण्याजाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शिबीर स्थळावर दिव्यांगांना भोजनाची व्यवस्था उपलब्ध राहणार आहे.

वर्धा लोकसभा क्षेत्रातील प्रत्येक तालुक्यात होणार साहित्य वाटप : खासदार रामदास तडस

भारताचे लोकप्रीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे  देशातील प्रत्येक दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी करण्याकरिता प्रयन्त करीत आहे. दिव्यांगांच्या अडचणी सोडविण्यासाठी सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालयातर्फे प्रयत्न केले जात आहे. त्यानुसार एडीप योजने अंतर्गत वर्धा लोकसभा क्षेत्रातील वर्धा व अमरावती जिल्हयातील प्रत्येक तालुका स्तरावर दिव्यांग तपासनी शिबीर घेण्यात आलेले होते. त्यानुसार वर्धा लोकसभा क्षेत्रातील एकुण ४ हजार ७८ दिव्यांगांना ५ हजार १०७ सहाय्यक उपकराचे वाटप होणार आहे. प्रत्येक तालुक्यात पंचायत समिती स्तरावर दिव्यांगांना साहित्य वाटप करण्यात येणार असून प्रत्येक दिव्यांगाला वाटपाची तारीख व स्थळ प्रशासनाच्या वतीने कळविण्यात येणार, असल्याचे यावेळी खासदार रामदास तडस म्हणाले.





  Print






News - Wardha




Related Photos