महत्वाच्या बातम्या

 २१ व २२ सप्टेंबर ला पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार हे २१ व २२ सप्टेंबर २०२३ रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

गुरुवार, २१ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता मुल नगरपालिका अतंर्गत महसुल विभागाचे पट्टे वाटप कार्यक्रमास उपस्थिती. सायं.४ वाजता लखमापूर मंदीर परीसरातील विविध सौंदर्य विकासकामाचे व पाण्याच्या टाकीचे उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. सायं.७ वाजता मेडीकल कॉलेज गणेश उत्सवाला भेट. त्यानंतर चंद्रपूर येथे मुक्काम. 

शुक्रवार २२ सप्टेंबर रोजी सायं.४ वाजता पटवारी भवन, राजुरा येथे आयोजित कृषी सेवक मोफत मार्गदर्शन व प्रशिक्षण शिबिर कार्यक्रमास उपस्थिती. सायं. ७ वाजता चंद्रपूर येथील गणेश उत्सव मंडळाला भेट देतील. त्यानंतर चंद्रपूर येथे मुक्काम.





  Print






News - Chandrapur




Related Photos