प्राणहिता अभयारण्याच्या सीमेलगत पाण्याअभावी रानगव्याचा मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /अहेरी :
सिरोंचा वनविभागाअंतर्गत येत असलेल्या प्राणहिता वनपरिक्षेत्रातील प्राणहिता अभयारण्याच्या  सीमेला लागून असलेल्या नियतक्षेत्र वट्रा बुर्ज - १ च्या  व खंड क्रमांक २६४ मध्ये वनरक्षकाच्या गस्ती दरम्यान आज सकाळी वन्यप्राणी रानगवा  (इंडियन बायसन ) मृतावस्थेत आढळून आला. 
रानगवा   हा प्राणी भारतीय वन्यजीव कायदा १९७२ चे शेड्युल -१ भाग -१ मधील प्राणी आहे.  मोक्का चौकशी मध्ये आज  ४ जून रोजी पंचनामा नोंदविण्यात आला आहे . अति उष्णतेमुळे तसेच वन्यप्राणी वयाने वयोवृद्ध असल्याने व घटनेच्या ठिकाणापासून दूर दूर पर्यंत पिण्याच्या पाण्याचे स्रोत नसल्याने त्याला पाणी मिळाले नाही. यामुळे   त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज आहे . त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली व मृत अवयव जाळुन नष्ट करण्यात आले .  प्रकरणाची चौकशी वनपरिक्षेत्राधिकारी एस. बी. दगडे यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-06-04


Related Photos