नागपूर येथे मनोरुग्णाची पेटत्या चितेमध्ये उडी घेऊन आत्महत्या


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर :
पेटत्या चितेमध्ये उडी घेऊन एका मनोरुग्ण तरुणाने आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे. एमआयडीसी पोलीस स्टेशन आवारात हा प्रकार घडला आहे. शनिवारी संध्याकाऴी सहाच्या सुमारास महेश मारुती कोटांगले या ३२ वर्षीय तरुणाने चितेमध्ये उडी मारली. जयताळा येथील आंबेडकर नगरामध्ये महेश राहत होता. तो मजुर करत होता. गेल्या तीन वर्षांपासून त्याच्या मनावर परिणाम झाला होता.
एका मयत व्यक्तीचे नातेवाईक मृतदेहाला अग्नी देऊन परतत होते. यावेळी परिसरातच खेळणारी मुले ओरडत बाहेर आली. महेशने चितेत उडी घेतल्याचे त्यांनी लोकांना सांगितले. यावेळी लोकांनी स्मशानभुमीत धाव घेतली. मात्र तोवर महेश जळून खाक झाला होता.  Print


News - Nagpur | Posted : 2019-06-02


Related Photos