महत्वाच्या बातम्या

 शेतकऱ्यांनी मानले आमदार विनोद अग्रवाल यांचे आभार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गोंदिया : गोंदिया तालुक्यातील श्रीराम अभिनव धान खरेदी केंद्रामध्ये धान विक्री केलेल्या शेतकऱ्यांनी आमदार विनोद अग्रवाल यांच्या घरापुढे आंदोलन पुकारले होते. तब्बल ३६ तास चाललेल्या या आंदोलनाला आमदार विनोद अग्रवाल यांनी ४ तारखेचे वचन देऊन आंदोलकांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली होती. त्याला मान देत आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले होते. आमदार विनोद अग्रवाल यांनी शब्द पाळल्यामुळे जवळपास ४०० पेक्षा अधिक शेतकरी बांधवांचे ३ कोटी ५० लक्ष रुपये देण्याचे आदेश पत्रकाद्वारे ५ सप्टेंबर २०२३ ला काढण्यात आले होते. त्या नंतर २ ते ३ दिवसात शेतकरी बांधवांच्या मोबाईल वर पैसे जमा होण्याचे संदेश प्राप्त होताच शेतकरी बांधवांनी आमदार कार्यालय गाठून आमदार विनोद अग्रवाल यांचे अभिनंदन केले.

असा होता घटनाक्रम :

२९ ऑगस्ट : आमदार विनोद अग्रवला यांच्या घरासमोर शेतकरी आंदोलन सुरु

३० ऑगस्ट : आमदार विनोद अग्रवाल यांच्या विनंतीपर सायंकाळी शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले

४ सप्टेंबर : मुख्यमंत्री महोदयांनी फाईलवर सही केली

५ सप्टेंबर : शेतकऱ्यांना पैसे देण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले.

८ सप्टेंबर :  शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात

सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी : आमदार विनोद अग्रवाल अन्न दाता सुखी भव हे भाव माझ्या मनात असून मी सदैव शेतकरी बांधवांच्या पाठीशी उभा असल्याचे सुतोवाच आमदार विनोद अग्रवाल यांनी केले. 





  Print






News - Gondia




Related Photos