महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


२८ सप्टेंबर महत्वाच्या घटना

१९२४ : पहिली पृथ्वी प्रदक्षिणा करणारी विमान फेरी पूर्ण झाली.सुट्टी पॅकेज निवडा

१९२८ : सर अलेक्झांडर फ्लेमिंग यांना प्रयोगशाळेत विशिष्ट प्रकारच्या जिवाणूंची वाढ होताना आढळली. यातूनच पुढे पेनिसिलिन या प्रतिजैविकाचा शोध लागला.

१९३९ : दुसरे महायुद्ध – वॉर्साने नाझी जर्मनीसमोर शरणागती पत्करली.

१९५० : इंडोनेशिया देशाचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.

१९५८ : फ्रान्स देशाने नवीन संविधान स्वीकारले.

१९६० : माली आणि सेनेगल देशांचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.

१९९९ : आशा भोसले यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर.

२००० : नाटककार विजय तेंडुलकर यांना विष्णुदास भावे गौरव पुरस्कार जाहीर.खगोलशास्त्र कोर्स शोधा

२००२ : सलमान खान यांच्या पांढऱ्या टोयोटा लँडक्रुझर गाडीचा वांद्रे येथे अपघात, अपघातात १ मृत्यू टर ४ गंभीर जखमी. सलमान खानच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले. पोलिसांकडून अटक व जमीन वर सुटका.

२००८ : स्पेसएक्स कंपनी ने फाल्कन १ हे पहिले खाजगी अंतराळयान प्रक्षेपित केले.

२०१८ : सुलावेसी भूकंप २०१८ - या ७.५ रिश्टर भूकंपामुळे निर्माण झालेल्या मोठ्या त्सुनामी दुर्घटने मध्ये किमान ४३४० लोकांचे निधन तर १० हजार पेक्षा जास्त लोक जखमी.

१९९४ : एमएस एस्टोनिया क्रूझ - हे जहाज बाल्टिक समुद्रात बुडाले त्यात किमान ८५२ लोकांचे निधन.

१९५१ : पहिले रंगीत टेलिव्हिजन - CBS ने पहिले रंगीत टेलिव्हिजन सर्वसामान्यांना विक्रीसाठी उपलब्ध केले,

१९४४ : दुसरे महायुद्ध - सोव्हिएत सैन्याने एस्टोनियामधील क्लोगा एकाग्रता छावणीला मुक्त केले.

१९४१ : दुसरे महायुद्ध - उत्तर ग्रीसमधील बल्गेरियन ताब्याविरुद्ध नाटकीय उठाव सुरू झाला.

१९३९ : दुसरे महायुद्ध - नाझी जर्मनी आणि सोव्हिएत युनियन पोलंडच्या विभाजनावर सहमत झाले.

१९१८ : पहिले महायुद्ध - यप्रेसची पाचवी लढाई: सुरू झाली.

१९१२ : फ्रँक एस. स्कॉट - हे विमान अपघातात मरण पावलेले पहिले युनायटेड स्टेट्स आर्मीचे कॉर्पोरल भरती झालेले व्यक्ती आहे.

२८ सप्टेंबर जन्म

१८०३ : फ्रेंच कथालेखक, नाटककार, इतिहासकार आणि पुरातत्त्वज्ञ प्रॉस्पर मेरिमी यांचा जन्म. (मृत्यू: २३ सप्टेंबर १८७०)

१८३६ : बॉलकोक चे संशोधकथॉमस क्रैपर यांचा जन्म. (मृत्यू: २७ जानेवारी १९१०)

१८६७ : जपानी पंतप्रधान कीचिरो हिरानुमा यांचा जन्म.

१८९८ : स्वातंत्र्यसैनिक व पत्रकार शंकर रामचंद्र तथा मामाराव दाते यांचा जन्म.

१९०७ : क्रांतिकारक भगत सिंग यांचा जन्म. (मृत्यू: २३ मार्च १९३१)

१९०९ : हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते पी. जयराज यांचा जन्म. (मृत्यू: ११ ऑगस्ट २०००)

१९२५ : अमेरिकन संगणकशास्त्रज्ञ सेमूर क्रे यांचा जन्म.

१९२९ : जगप्रसिद्ध पार्श्वगायिका लता मंगेशकर यांचा जन्म.

१९४६ : पाकिस्तानी क्रिकेट कप्तान माजिद खान यांचा जन्म.

१९४७ : बांगलादेशच्या १०व्या पंतप्रधान शेख हसीना यांचा जन्म.

१९६६ : भारतीय दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथालेखक पुरी जगन्नाथ यांचा जन्म.

१९८२ : ऑलिम्पिकमध्ये वयक्तिक सुवर्णपदक मिळवणारे पहिले भारतीय अभिनव बिंद्रा यांचा जन्म.

१९८२ : चित्रपट अभिनेता रणबीर कपूर यांचा जन्म.

१९४० : भारतीय कादंबरीकार, केरळचे पहिले आदिवासी कादंबरीकार नारायण यांचा जन्मं (मृत्यू : १६ ऑगस्ट २०२२)खगोलशास्त्र कोर्स शोधा

१९२४ : भारतीय लेखक सुन्द्री उत्तमचंदानी यांचा जन्म (मृत्यू : ८ जुलै २०१३)

१८५२ : फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक - नोबेल पारितोषिक हेन्री मॉइसन यांचा जन्म (मृत्यू : २० फेब्रुवारी १९०७)

२८ सप्टेंबर मृत्यू

१८९५ : रेबीज किंवा हैड्रोफोबिया रोगावर लस शोधणारें रसायनशास्त्रज्ञ लुई पाश्चर यांचे निधन. (जन्म: २७ डिसेंबर १८२२)

१९३५ : कायनेटोस्कोप चे संशोधक विल्यम केनेडी डिक्सन यांचे निधन. (जन्म: ३ ऑगस्ट १८६०)

१९५३ : अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ एडविन हबल यांचे निधन. (जन्म: २० नोव्हेंबर १८८९)

१९५६ : बोइंग विमान कंपनीचे संस्थापक विल्यम बोइंग यांचे निधन. (जन्म: १ ऑक्टोबर १८८१)डिजिटल कॅलेंडर निवडा

१९७० : इजिप्तचे दुसरे राष्ट्राध्यक्ष गमाल अब्दल नासर यांचे निधन.

१९८१ : व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष रोम्लो बेटानको यु र्ट यांचे निधन.

१९८९ : फिलिपाइन्सचे १० वे राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड मार्कोस यांचे निधन. (जन्म: ११ सप्टेंबर १९१७)

१९९१ : अमेरिकन जॅझ संगीतकार माइल्स डेव्हिस यांचे निधन.

१९९२ : पानशेत पूरग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी दीर्घकाळ लढा देणारे मेजर ग. स. ठोसर यांचे निधन.

१९९४ : भारतीय चित्रपट अभिनेते आणि कॉमेडियन के. ए. थांगवेलू यांचे निधन. (जन्म: १५ जानेवारी १९१७)

२००० : सोलापूरचे प्रसिद्ध पंचांगकर्ते श्रीधरपंत दाते यांचे निधन.

२००४ : इंग्रजी भाषेतून लिखाण करणारे लेखक डॉ. मुल्कराज आनंद यांचे निधन. (जन्म: १२ डिसेंबर १९०५)

२०१२ : चित्रपट संकलनासाठी शोले या चित्रपटाचे सर्वोत्तम पारितोषिक विजेते प्रसिद्ध संकलक एम. एस. शिंदे यांचे निधन.

२०१२ : राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ब्रजेश मिश्रा यांचे निधन. (जन्म: २९ सप्टेंबर १९२८)

२०२२ : राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या अध्यक्षा जयंती पटनायक यांचे निधन (जन्म: ४ एप्रिल १९३२) 

२०२० : भारतीय साहित्यिक समीक्षक आणि लेखक - साहित्य अकादमी पुरस्कार गुरुराजा श्यामाचार्य अमूर यांचे निधन (जन्म: ८ मे १९२५)

२०१६ : इस्रायल देशाचे ९वे राष्ट्राध्यक्ष, पोलिश-इस्रायली राजकारणी शिमोन पेरेस यांचे निधन (जन्म: २ ऑगस्ट १९२३)

२००७ : नॅशनल हॉट रॉड असोसिएशनचे संस्थापक, अमेरिकन उद्योगपती वॅली पार्क्स यांचे निधन (जन्म: २३ जानेवारी १९१३)

१९९८ : भारतीय हिंदी लेखक शिवप्रसाद सिंग यांचे निधन (जन्म: १९ ऑगस्ट १९२८)खगोलशास्त्र कोर्स शोधा

१९३८ : दुर्यिया मोटर वॅगन कंपनीचे संस्थापक चार्ल्स दुर्यिया यांचे निधन (जन्म: १५ डिसेंबर १८६१)





  Print






Related Photos