संसदेमध्ये एनडीएच्या संसदीय पक्षांची बैठक सुरू, नरेंद्र मोदी यांची एनडीएचे नेते म्हणून निवड


- प्रचंड जनादेशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मानले आभार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
  लोकसभा निवडणुकीमध्ये  बहुमत मिळवल्यानंतर शनिवारी संसदेमध्ये एनडीएच्या संसदीय पक्षांची बैठक सुरू आहे. या बैठकीमध्ये नरेंद्र मोदी यांची एनडीएचे नेते म्हणून निवड केली आहे.  यानंतर रात्री आठ वाजता एनडीएचे नेते राष्ट्रपतींची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा करतील.
 बैठकीत नरेंद्र मोदी जनतेला संबोधित करताना म्हणाले की, संपूर्ण जगाचं लक्ष हिंदुस्थानच्या निवडणुकांकडे लागलं होतं. एखादी निवडणूक किती मोठी व्यापक असू शकते, हे जगासाठी एक आश्चर्य आहे. निवडणूक म्हणजे संबंधित अधिकारी, कर्मचारी, सुरक्षा दल आणि निवडणूक आयोगासाठी एक कठोर कालखंड असतो. या कामासाठी योगदान देणाऱ्या हरएक लहान मोठ्या घटकाचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार. निवडणूक हा एक उत्सव आहे. मतदानही अनेक रंगांनी रंगलेलं होतं. पण विजयोत्सव हा अधिक रंगतदार आहे. देशाच्या या विजयोत्सवात जे जे सामील झाले त्या सर्वांचे अभिनंदन, असं मोदी यावेळी म्हणाले. 
 मोदी पुढे म्हणाले की, प्रचंड प्रमाणातला जनादेश हा तितक्याच मोठ्या जबाबदारीला जन्म देतो. यासाठी नवी उर्जा आणि नवी आशा लागते, आम्हाला तेच घेऊन पुढे जायचं आहे. लोकशाहीला अजून समजून घेणं आवश्यक आहे. देशातील नागरिकांचा नीरक्षीरविवेक समजून घेणं आवश्यक आहे. भारताची लोकशाही दिवसेंदिवस प्रगल्भ होत जात आहे. अनेक पारंपरिक गोष्टी जसं की सत्तेचा प्रभाव मतदार प्रभावित करू शकत नाही. मोठ्यातील मोठ्या सत्तेच्या सामर्थ्यासमोरही मतदार सेवाभावाला मत देतात. जनताने आम्हाला सेवाभावासाठीच स्वीकारलं आहे.   Print


News - World | Posted : 2019-05-25


Related Photos