महत्वाच्या बातम्या

 पशुसंवर्धन विभागाद्वारे प्रशिक्षण शिबिराचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : सुशिक्षित बेरोजगार आणि पशुपालकांसाठी कुकुट पालन, शेळीपालन,पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय  प्रशिक्षणाचे आयोजन कुकुट प्रशिक्षण केंद्र, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय बॉटनिकल गार्डन जवळ सेमिनिरी हिल्स येथे १ सप्टेंबरपासून  करण्यात आले आहे.

प्रशिक्षणाचा लाभ घेण्याकरिता अनुसूचित जाती, जमाती व दारिद्र्य रेषेखालील (प्रमाणपत्र आवश्यक) प्रशिक्षणार्थीना शेळीपालन व दुग्धव्यवसाय प्रशिक्षणाकरिता १०० रुपये आणि सामान्य वर्गा करीता २०० रुपये प्रशिक्षण शुल्क निर्धारीत केले आहे.

या शिबीरात सुशिक्षित बेरोजगार, पशुपालकांना तसेच पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांचे लाभार्थी व प्रशिक्षण घेण्यास इच्छुक असलेल्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी तांत्रिक मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

या प्रशिक्षणात विषयातील तज्ज्ञ अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. तसेच प्रशिक्षणार्थीना प्रक्षेत्रावर भेट आयोजित करून प्रत्यक्ष व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रशिक्षणार्थीना प्रमाणपत्र देण्यात येईल. सुशिक्षित बेरोजगार आणि पशुपालक यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. नितीन फुके यांनी केले आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos