महत्वाच्या बातम्या

 वाहन चालकासाठी ३१ ऑगस्टला नेत्र व आरोग्य तपासणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : राज्यामध्ये होणाऱ्या गंभीर अपघातांचे विश्लेषण केल्यानंतर बसेसच्या अपघातांमध्ये होणारी जीवितहानी सर्वाधिक आहे. 

ही जीवितहानी टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या बसचालकांचे नेत्र व आरोग्य तपासणी तसेच रस्ते सुरक्षेबाबत समुपदेशन करण्यासाठी गुरुवार ३१ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या कालावधीत हिंदु ह्दय सर्माट बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्ग, टोल प्लाझा, नागपूर येथे नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व वाहन चालकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नागपूर (पूर्व) यांनी केले आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos