गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्रात २०१४ पेक्षा नोटा ला १११ मते अधिक , सर्वाधिक नोटा वर मतदान झालेला पहिला मतदारसंघ


- अहेरी  विधानसभा क्षेत्रात सर्वाधिक ६९८३ मते  
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्राच्या २०१४ च्या निवडणूकीत नोटावर २४ हजार ४८८ मतदारांनी मतदान केले होते. त्याचप्रमाणे यावर्षीही नोटा वर मतदान वाढले आहे. यावर्षीच्या निवडणुकीत २४ हजार ५९९ मतदारांनी नोटा वर मतदान केले आहे. म्हणजेच २०१४ लोकसभा निवडणुकीपेक्षा १११ मते नोटा ला अधिक मिळाली आहेत. विशेष म्हणजे देशातील नोटा ला सर्वाधिक मतदान होणार पहिला मतदारसंघ आहे. 
२०१९ च्या निवडणूकीतवर ओबीसी समाजाने बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. अशातही लोकसभा क्षेत्रात विक्रमी मतदान झाले. मात्र नोटावर मतदान करणाऱ्या मतदारांची संख्या यावर्षीही अधिक आहे.  
लोकसभा क्षेत्रातील आमगाव विधानसभा क्षेत्रात २५५०, आरमोरी  विधानसभा क्षेत्रात ४११४, गडचिरोली  विधानसभा क्षेत्रात ५२६३, अहेरी  विधानसभा क्षेत्रात सर्वाधिक ६९८३, ब्रम्हपुरी  विधानसभा क्षेत्रात २५२१, चिमूर  विधानसभा क्षेत्रात २७८७ मतदारांनी नोटा वर मतदान केले आहे तर १८१ पोस्टल मते नोटा वर पडली आहेत. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-05-24


Related Photos