भाजपध्यक्ष अमित शहा विजयी


वृत्तसंस्था /  गांधीनगर : भाजपध्यक्ष अमित शहा पहिल्यांदा लोकसभा निवडणुकीच्या  मैदानात उतरले होते. गांधीनगर हा भाजपचा बालेकिल्ला आहे. हा गड राखण्यात अमित शहा यांना यश आले आहे. सर्व देशाचे लक्ष या मतदारसंघाकडे लागले होते. सुरूवातीलाच त्यांना अडीच लाखांची आघाडी मिळाली होती.
  अमित शहा यांच्या विरोधात काँग्रेसने डॉ. सीजे चावडा यांना उमेदवारी दिली होते. त्यांचा अमित शहा यांनी आठ लाख मतांनी पराभव केला आहे. गांधीनंगर हा भाजपचा बालेकिल्ला समजला जातो. भाजपचेच माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनी १९८९ या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. २०१४ पर्यंत त्यांनी पराभव स्विकारला नाही.   Print


News - World | Posted : 2019-05-23


Related Photos