महत्वाच्या बातम्या

 वर्धा जिल्हयातील मंजुर असलेले विविध विकास कामे तातडीने मार्गी लावावे : खा. रामदास तडस यांचे सा.बा. विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देश


- बजाज चौक व सिंदी रेल्वे रेल्वे उड्डाण पुलाच्या कामासंबधीत अधिकाऱ्यांना धरले धाऱ्यावर

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : वर्धा लोकसभा मतदार संघातील विविध विकास कार्याचा आढावा घेण्याकरिता खासदार रामदास तडस यांनी आढावा बैठक आयोजीत केली होती, बैठकी दरम्यान बजाज चौक व सिंदी उड्डाण पुल कार्याला विलंब होत असल्याने प्रचंड नाराजी व्यक्त करुन खासदार रामदास तडस यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरुन कुठल्याही परिस्थीतीत काम तातडीने पुर्ण करण्याचे निर्देश उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. 

सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत येणाऱ्या विविध विकास कामांचा आढावा घेण्याकरिता आढावा बैठकीचे आयोजन विश्राम गृह वर्धा येथे खासदार रामदास तडस यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली होती. या बैठकीला यावेळी कार्यकारी अभियंता सतिश अंभोरे, उपविभागीय अधिकारी सा.बा. १ वर्धा, राजेंद्र आचार्य, उपविभागीय अधिकारी सा.बा. २ वर्धा महेश माथुरकर, उप विभागीय अधिकारी पुलगांव अरुण मुत्तेलवार, उपविभागीय अधिकारी देवळी व्ही.एस.व्यास, उपविभागीय अधिकारी सेलु किशोर हिवरे, शाखा अभियंता मतिन नलगिरे, केंद्रीय सासंद सदस्य रस्ते सुरक्षा समितीचे अशासकीय सदस्य प्रणव जोशी यांची उपस्थिती होती.

बैठकीदरम्यान बजाज चौक रेल्वे उड्डाण, सिंदी रेल्वे येथील रेल्वे उड्डाणपुल, पुलगांव येथील पुल रेल्वे उड्डाणपुल, केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत मंजुर असलेला कामे, HAM अंतर्गत मंजुर व प्रस्तावित असलेले विकास कार्य, तसेव वर्धा जिल्हयात सुरु असलेले विविध विकास कार्यावर चर्चा करण्यात आली.

बजाज चौक येथील उड्डाण पुलांच्या लॉंचीक करिता रेल्वेविभागाला मेगा ब्लॉक मिळण्याकरिता परवानगी अर्ज सादर केलेला आहे, वर्धा आणि सिंदी रेल्वे एकाच वेळेला मेगा ब्लॉक करुन पुलाचे काम संपन्न करण्याचा प्रयत्न असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सतिश अंभोरे यांनी यावेळी सांगीतले. पुलगांव येथील रेल्वे उड्डाण पुलाचे रखडलेले काम सुरु करण्याच्या उद्देशाने मुख्य अडथळा असलेल्या अतिक्रमन हटविण्यात आले आहे, इलेक्ट्रीक शिफ्टींगचे काम सुरु झालेले आहे. भूमीअधिग्रहनचे काम सुध्दा पुर्ण झाले आहे. दिवाळीपर्यंत पुलांचे काम सुरळीत सुरु होईल, तसेच जिल्हयातील एकुण १०० किमी पेक्षा जास्त HAM अंतर्गत कामे शासनाला प्रस्तावीत केलेले आहे. पुरवणी अर्थसंकल्पात युटीलीटी शिफ्टींग व भुसंपादनाचे कामे मंजुर करुन दिल्यास जिल्हयातील रस्ते विकासाकरिता मदत होईल असे उपस्थिती अधिकारी वर्गाने सांगीतले.

केंद्र सरकारच्या माध्यमातुन अनेक विकास प्रकल्प वर्धा जिल्हयाकरिता मंजुर झालेली आहे. या विकास कामांचा आढावा घेण्याकरिता तसेच वर्धा, सिंदी, पुलगांव येथिल रेल्वे उड्डापुलाचा प्रकल्प तातडीने पुर्ण होण्याकरिता आज आढावा बैठक आयोजीत करण्यात आली होती. वर्धा जिल्हयातील अनेक मंजुर झालेले प्रकल्प पुर्ण झाले, परंतु २०१६ मंजुर असलेला वर्धा येथील बजाज चौक येथील उड्डाण पुलाचे अजुन पंर्यत पुर्ण झाला नाही, ही खेदाची बाब आहे. मंजुर असलेली कामे वेळेत पुर्ण करावी अशी अपेक्षा खासदार रामदास तडस यांनी यावेळी व्यक्त केली व रेल्वे विभागाच्या मेगा ब्लॉक करिता रेल्वे विभागाला माहिती व रिपोर्ट पाठवा, रेल्वे विभाग सर्व परवानगी करिता काही माझी काही मदत लागली तर मला सांगा मी रेल्वे विभागाची परवानगी आणून देतो असे उपस्थित खासदार रामदास तडस यांनी अधिकारी वर्गाला सांगीतले.  





  Print






News - Wardha




Related Photos