महत्वाच्या बातम्या

 वनपट्टे धारक शेतकऱ्यांसाठी विहीर व सोलर पंप योजना


-  अनुसुचित जमातीच्या लाभार्भ्यांना अर्ज करण्याचे आवाहन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : अनुसुचित जमातीच्या वनपट्टे प्राप्त असणाऱ्या लाभार्थ्यांना शेतीला पाणी पुरवठा करण्याकरीता विहिरीची निर्मिती करणे, शेतीत सोलरपंप बसवून त्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी योजना सुरु करण्यात आली आहे. यासाठी अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांनी अर्ज सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत विशेष केंद्रीय सहाय्य योजनेंतर्गत जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या वनहक्क कायदा २००६ अंतर्गत वनपट्टे प्राप्त असणाऱ्या अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना शेतीला पाणी पुरवठा करण्याकरीता सदर योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक लाभार्थ्यांनी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातुन अर्ज प्राप्त करुन आवश्यक कागदपत्रासह १० सप्टेंबर पर्यत सादर करावे. 

योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी अनुसूचित जमातीचा असावा. त्याच्याकडे सक्षम अधिकाऱ्यांचे जात प्रमाणपत्र असावे, अर्जसोबत रहिवासी दाखला, वनहक्क कायद्याद्वारे वनपट्टा प्राप्त झाल्याचे प्रमाणपत्र, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक प्रथम पानाची सत्यप्रत, सातबारा, ८-अ चा उतारा, तहसिलदारांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला, विहिर प्रस्तावित असलेल्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता असल्याचे भुजल सर्व्हेक्षण यंत्रणेचे प्रमाणपत्र, किमान जमिन क्षेत्र, सदर योजनेचा लाभ यापुर्वी  आदिवासी विकास विभाग अथवा  इतर कोणत्याही शासकीय विभागाकडून घेतला नसल्याचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे, असे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी दिपक हेडाऊ यांनी कळविले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos