महत्वाच्या बातम्या

 ५० महिला भाविकांचा जत्था अयोध्येला रवाना


- माजी नगराध्यक्ष शोभा तडस यांचे नेतृत्व.

- खा. रामदास तडस यांनी दाखवली झेंडी.

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा (देवळी) : मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र यांच्या जन्मभूमीचे दर्शन घेण्यासाठी देवळीतील पन्नास महिला भाविकांचा जत्था अयोध्येला रवाना झाले. माजी नगराध्यक्ष शोभा तडस यांची नेतृत्वातील भाविकांच्या जत्थात शेतकरी, शेतमजूर महिलांचा समावेश करण्यात आला. मंगळवार चे सकाळी ५ वाजता खा. रामदास तडस यांनी भाविकांच्या वातानुकूलित गाडीला झेंडी दाखवून त्यांची पुढील प्रवासासाठी रवानगी केली.

प्रभू रामचंद्र यांच्या जन्मभूमीचे दर्शन घेण्याची सामान्य महिलांची इच्छा या माध्यमातून साकारण्यात आली. यासाठी खा. तडस यांनी पुढाकार घेऊन शेतकरी, शेतमजूर तसेच सामन्य महिला भाविकांची निशुल्क व्यवस्था केली. 

यावेळी अयोध्या भेटीत भाविकांच्या वतीने संपूर्ण भारतवासीयांचे श्रद्धास्थान असलेल्या प्रभू रामचंद्र यांना साकडे घातले जाणार आहे. सोबतच प्रयागराज, मय्यर व इतर धार्मिक स्थळांना भेटी देण्यासोबतच या भागातील शेतीव्यवसायाचे अवलोकन करण्यासाठी अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला आहे. भाविकांचा या जत्थात माजी नगराध्यक्ष शोभा तडस यांचे सहित सुचिता मडावी, ज्योती खाडे, माधुरी तडस, शुभांगी कुर्जेकर, माया वडेकर, सारंगा मडावी, सारिका लाकडे, सुनीता बकाने, माला लाडेकर, छाया तडस, सुरेखा भुते, ललिता मातकर, रवी कारोटकर, उमेश कामडी, प्रशांत डुकरे तसेच महिला भाविकांचा समावेश करण्यात आला.





  Print






News - Wardha




Related Photos