चंद्राचा आकार ५० मीटरने घटला : नासा


वृत्तसंस्था / मुंबई :  चंद्राचा आकार ५० मीटरने घटला असल्याचे संशोधन 'नासा' च्या शास्त्रज्ञांनी मांडले आहे.   हजारो वर्षात हे बदल होत असल्याचे खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी नमूद केले आहे. 
चंद्राचा व्यास ३ हजार, ४७६ किमी असून, त्याच्या आकारात ५० मीटरने घट झाल्याचे संशोधन 'नासा' च्या वैज्ञानिकांनी नुकतेच जाहीर केल्याचे सोमण यांनी स्पष्ट केले आहे. पृथ्वीवर होणाऱ्या भूकंपांप्रमाणेच चंद्रावर चंद्रकंप होत असून त्यामुळे चंद्रांचा पृष्ठभाग आक्रसला जात आहे. त्यामुळे चंद्राचा आकार कमी झाल्याचा शास्त्रज्ञांचा प्राथमिक अंदाज आहे.  पृथ्वीपासून चंद्र हा सरासरी ३ लाख, ८४ हजार किमी अंतरावर आहे. टायडल फोर्सेसमुळे चंद्र दरवर्षी ३.८ सेंटीमीटरने दूर जात आहे. चंद्र पृथ्वीच्या जवळ येतो त्यावेळी तो मोठा दिसतो. पृथ्वीपासून दूर जातो त्यावेळी पृथ्वीवरून पाहताना चंद्रबिंब छोटे दिसते. पण, नासाच्या शास्त्रज्ञांनुसार प्रत्यक्षात चंद्राचा आकार ५० मीटरनी कमी झाला आहे. बुध ग्रहाचा आकारही कमी होत असून, पृथ्वीचा स्वत:भोवती भ्रमण करण्याचा वेगही मंदावत असल्याचे सोमण यांनी सांगितले. 

   Print


News - World | Posted : 2019-05-15


Related Photos