महत्वाच्या बातम्या

 वासेरा बसस्थानकावर साकारतोय बालोद्यान व व्यायामशाळा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / सिंदेवाही : सिन्देवाही तालुक्यातील वासेरा येथे बसस्थानकावर ग्रामपंचायतीचे वतीने बालोद्यान व व्यायामशाळेचे बांधकाम सुरु करण्यात आले आहे. खनिज विकास निधीमधुन वासेरा ग्रामपंचायतीला व्यायामशाळेचे साहित्य मिळाले आहे. पण त्यासाठी योग्य ती जागा ग्रामपंचायत हद्दीमध्ये गावाशेजारी न मिळाल्याने सर्व साहित्य ग्रामपंचायत कार्यालय येथेच ठेवण्यात आले होते. ग्रामपंचायत गावाच्या शेवटच्या टोकावर असल्यामुळे व्यायाम करण्यासाठी जाणे अवघड होत होते. हीच बाब सरपंच महेश बोरकर यांच्या लक्षात येवुन बसस्थानकावर स्थानबद्ध केल्यास त्याचा फायदा नागरिकांना होवु शकतो याच विचाराने हा उपक्रम हाती घेण्यात आला.

वासेरा बसस्थानक परिसरात पाच दिशेला जाणारे रस्ते आहेत. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफ्फर झोन मध्ये वासेरा गाव येतो. नैसर्गिक वातावरण असल्याने गावातील नागरिक याच चौकातुन शिवणी वनपरीक्षेत्रात पहाटे फिरायला जातात.व्यायामशाळा व बालोद्यान बसस्थानकावर होत असल्यामुळे याचा फायदा पहाटे फिरायला जाणार्या नागरिकांना होणार आहे.

या कामाचे ले-आऊट टाकुन खोदकाम व बांधकाम सुरु करण्यात आले आहे. या कामाच्या पुर्णत्वासाठी ग्रामपंचायत कमेटीने पुढाकार घेतलेला आहे. यात सरपंच महेश बोरकर, उपसरपंच मंदा मुनघाटे, ग्रामविकास अधिकारी राजेन्द्र मानकर, सदस्य दिलीप मेश्राम, महेन्द्र सुर्यवंशी, नागेश बंडीवार, निखिल कोवे, माया सलामे, अस्मिता रामटेके, सुरेखा चिमलवार, प्रीती कारमेंगे, गीता मेश्राम सोबत ग्रामपंचायत कर्मचारी शालिक नन्नावरे, भाष्कर कोवले, सुनिल बोरकर, रमेश मेडीवार हे प्रयत्न करीत आहेत.





  Print






News - Chandrapur




Related Photos