महत्वाच्या बातम्या

 स्वातंत्र्य दिनामित्य जिल्हाधिकारी यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण


- विरमाता व विरपत्नींचा सत्कार

- माझी कन्या भाग्यश्री योजनेचे मुदतीठेव प्रमाण वितरण

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : भारतीय स्वातंत्र्याचा ७६ व्या वर्धापनदिनामित्य जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित मुख्य ध्वजारोहण समारंभात विरमाता व विरपत्नींचा सत्कार करण्यात आला. तसेच विविध पुरस्कारांचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, पोलिस अधीक्षक नूरूल हसन, अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड, अप्पर पोलिस अधीक्षक सागर कवळे उपस्थित होते.

विरमाता शांता वरहारे, विरपत्नी जयश्री चौधरी व अनिता इवनाते यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्याहस्ते शाल, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. जिल्हा उद्योग केंद्राच्यावतीने देण्यात येणाऱ्या उत्कृष्ट सुक्ष्म व लघु उद्योग पुरस्कार जयपुरकर फार्मासुटिकल ओपीसी  कंपनीला प्रथम व मे सेजल फूड प्रॉडक्ट उद्योगाला व्दितीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

जिल्हा अधिक्षक भुमी अभिलेख विभागाच्यावतीने पुलगाव येथील सीएडी कॅम्प येथील ४ हजार ८०० हे आर जमीनीची अत्याधुनिक रोवर मशिनने मोजणी करुन २ हजार यार्ड सिमा निश्चित केल्याबाबत भुकरमापक बजरंग पवार व रुपेश मार्कंड, जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालयामार्फत माध्यम साक्षरता ग्रामीण विकास संस्था बोपापूर व अभिलाष विजय डाहुर्ले, गुरुराज राऊत व प्राजक्ता पुरुषोत्तम मुते यांना जिल्हा स्तरीय युवा व युवती पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

शिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत पियुष विनोद कलंत्री या विद्यार्थ्यांस पीएसएस शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत निवड झाल्याबाबत प्रमाणपत्र देण्यात आले तसेच माझी कन्या भाग्यश्री योजनेंतर्गत श्रावणी विनोद पवार, चैतन्या विशाल सायंकार व तेजस्वी मंगेश खांडेकर यांना २५ हजार रुपये व निव्यांशी अतुल गोमासे यांना ५० हजार रुपयाचे मुदती ठेव प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.

पीएमएफएमई अंतर्गत उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या सुबोध पुंडलीकराव मानकर, मनोज विठ्ठलराव डगवार या कृषि सहाय्यकाचा तर युनियन बँक ऑफ इंडिया शाखा वर्धा, बँक ऑफ महाराष्ट्र शाखा सेलू या बँकेच्या शाखा व्यवस्थापकाचा व रत्नमाला संजय डोंगरे व अजय शंकर मोरे या जिल्हा संसाधन व्यक्तींचा सत्कार जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, जिल्हा पोलिस अधिक्षक नुरुल हसन  व अप्पर पोलिस अधिक्षक सागर कवळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.





  Print






News - Wardha




Related Photos