महत्वाच्या बातम्या

 इस्रोचा हनुमान झेपावणार : आदित्य एल१ मोहिमेची तयारी सुरू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली : भारताचे अवकाशात झेपावलेले चंद्रयान ३ हे चंद्राभोवती घिरट्या घालत आहे. १६ ऑगस्टला महत्वाचा टप्पा पार केल्यानंतर येत्या २६ ऑगस्टपर्यंत इस्त्रोचे हे यान चंद्राच्या काळाकुट्ट भागावर प्रकाश टाकण्यासाठी उतरणार आहे.

या साऱ्या घडामोडींमध्ये इस्रोच्या शास्त्रज्ञांनी थेट सुर्यालाच गवसणी घालण्याची तयारी सुरु केली आहे.

भारतीय अंतराळ संस्था इस्रोच्या सूर्य मोहिमेतील आदित्य एल१ च्या प्रक्षेपणाची तयारी सुरु झाली आहे. आदित्य एल१ आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा स्पेसपोर्टवर पोहोचल्याची माहिती इस्रोने दिली आहे. आदित्य एल१ सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात लॉन्च केले जाऊ शकते.

हा उपग्रह इस्त्रोच्या यु आर राव उपग्रह केंद्रात तयार करण्यात आला आहे. तेथून आदित्य एल१ आता उपग्रह प्रक्षेपणासाठी श्रीहरिकोटा येथे पोहोचला आहे. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी पाठवलेले इस्रोचे हे पहिलेच मिशन असणार आहे. आदित्य एल१ हे सूर्य-पृथ्वी प्रणालीच्या लॅन्ग्रेस बिंदूच्या जवळ असलेल्या प्रभामंडल कक्षेत लाँच केला जाणार आहे. हा पॉईंट पृथ्वीपासून १.५ दशलक्ष किलोमीटर अंतरावर आहे.

येथून सूर्याचे सतत निरीक्षण केले जाऊ शकते आणि सूर्यग्रहणाचा त्यावर परिणाम होत नाही, या ठिकाणचा सर्वात मोठा फायदा आहे. सूर्याच्‍या क्रियाकलापांचे विश्‍लेषण आणि अवकाशातील हवामानावर होणार्‍या परिणामांचे विश्‍लेषण करताना याचा मोठा फायदा होणार आहे.

आदित्य एल१ सोबत सात पेलोड्सही अवकाशात पाठवले जातील. हे पेलोड्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक आणि पार्टिकल आणि मॅग्नेटिक फील्ड डिटेक्टरच्या मदतीने सूर्याच्या फोटोस्फियर, क्रोमोस्फियर आणि सर्वात बाहेरील थराचा अभ्यास करतील. चार पेलोड सूर्याचे सतत निरीक्षण करतील आणि उर्वरित तीन पेलोड परिस्थितीनुसार कण आणि चुंबकीय क्षेत्राचा अभ्यास करतील, असे इस्त्रोने म्हटले आहे.





  Print






News - World




Related Photos