महत्वाच्या बातम्या

 केरळमध्ये शालेय अभ्यासक्रमात गांधी हत्या आणि गुजरात दंगलींचा अभ्यासक्रम


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली : केरळमध्ये महात्मा गांधी यांची हत्या आणि गुजरात दंगल शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात येणार आहे. शालेय पाठ्यपुस्तकांतून यापूर्वी या घटना वगळण्यात येतील, असा निर्णय एनसीआर्टीने घेतला होता.

मात्र, त्या नियमांमध्ये बदल करत या घटनांचा समावेश पुन्हा एकदा करण्यात येणार आहे.

या घटनांचा उल्लेख असलेली पाठ्यपुस्तके छापून तयार झाली आहेत. सप्टेंबरमध्ये या पुस्तकांचे वाटप करण्यात येईल. शिक्षण मंत्री व्ही. शिवनकुट्टी यांनी ही माहिती दिली आहे. सध्या केरळमधील शाळांना ओणम या सणाची सुट्टी आहे. सुट्टी संपल्यानंतर शाळा सुरू होईल तेव्हा ही पुस्तक वाटण्यात येतील. एनसीईआरटीच्या अभ्यासक्रमात काही भाग वगळण्यात आला होता. मात्र, आता महात्मा गांधी यांची हत्या, नेहरूंचा राजकीय-सामाजिक काळ, त्यांनी केलेल्या सुधारणा आणि गुजरात येथील दंगली यांचा या पुस्तकांमध्ये समावेश असेल. पाठ्यपुस्तकांचा अभ्यासक्रम निर्धारित करणाऱ्या समितीसोबत चर्चा केल्यानंतर समितीने आपल्या शिफारसी मान्य केल्याची माहिती शिवनकुट्टी यांनी दिली आहे.

विद्यार्थ्यांनी आपला इतिहास, अर्थशास्त्र आणि विज्ञान या विषयांना योग्य दृष्टिकोनातून पाहावे, अभ्यासावे हे गरजेचे आहे. केंद्राने या घटना गाळल्या होत्या आणि पिनाराई विजयन सरकारने विद्यार्थ्यांना देशातील वास्तव भावनांविषयी जाणीवर करून देण्याचे ठरवले असल्याने हा बदल करण्यात येणार आहे, अशी माहिती शिवनकुट्टी यांनी दिली आहे.





  Print






News - World




Related Photos