पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला जांभुळखेडा येथील नक्षल हल्ल्याचा निषेध


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : 
आज १ मे रोजी महाराष्ट्र दिनी कुरखेडा तालुक्यातील जांभुळखेडा जवळ नक्षल्यांनी भुसुरूंग स्फोट घडवून आणत १५ जवानांचा बळी घेतला आहे.  या हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निषेध केला आहे.  ट्विटरवरून त्यांनी नक्षल्यांना माफ केले जाणार नाही, असा संदेश दिला आहे.
सर्व शहीद जवानांना मी सलाम करतो. शहीद जवानांचे बलिदान विसरू शकणार नाही.  आम्ही शहीद जवानांच्या परिवारासोबत आहोत. हिंसक नक्षल्यांना माफ केले जाणार नाही, अशा प्रकारचा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-05-01


Related Photos