टायर फुटून कारने घेतला पेट, तिघांचा होरपळून मृत्यू , एक गंभीर


वृत्तसंस्था / उस्मानाबाद :   टायर फुटून रस्त्याच्या कडेला उलटलेल्या कारला भीषण आग लागली. या आगीत ३ जणांचा होरपळून मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी  झाल्याची  उमरगा तालुक्यातील तलमोड येथे आज रविवारी  घडली. आग एवढी भीषण होती की, कार क्षणात जळून खाक झाली.
प्राप्त माहितीनुसार  पुणे येथून चार तरुण यात्रेनिमित्त तलमोड येथे आले होते. त्यांच्या धावत्या कारचे पुढील टायर फुटून कारला भीषण आग लागली. नंतर गॅसचा स्फोट झाला. कार रस्त्याच्या कडेला उलटली. या आगीत चौघे होरपळले गेले. त्यांना उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. परंतु, त्यापैकी तिघांना डॉक्टरांना मृत घोषित केले.एकाचा प्रकृती चिंताजनक आहे.   Print


News - Rajy | Posted : 2019-04-21


Related Photos