धोडराज येथे कामासाठी आलेल्या आमगाव (महाल) येथील इसमाची गळफास लावून आत्महत्या


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भामरागड :
तालुक्यातील धोडराज येथील मजूरीचे काम करणाऱ्या इसमाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज २० एप्रिल रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली आहे.
देवनाथ उलगे नरोटे (४७)  रा. आमगाव (महाल) ता. चामोर्शी  असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे. तो धोडराज येथील कंत्राटदार हरी रापेल्लीवार यांच्याकडे मजूरीचे काम करण्यासाठी धोडराज येथे तीन दिवसांपूर्वी आला होता. केवळ एक दिवस काम केल्यानंतर आज २० एप्रिल रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास आपल्या खोलीचे दार बंद करून घेत त्याने गळफास घेतला. सदर घटना सकाळी ९ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. त्याने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप कळलेले नाही. घटनेचा तपास धोडराज पोलिस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी कदम करीत आहेत. मृतदेहाचे शवविच्छेदन करून देवनाथ याचा मुलगा हेमराज नरोटे याच्या सुपूर्द करण्यात आले आहे. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-04-20


Related Photos