महत्वाच्या बातम्या

 हॅप्पी जर्नी मित्रा - चांद्रयान-३..!


प्रिय चांद्रयान-३

सर्वश्री भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इसरो) व १४० कोटी जनतेच्या अनंत शुभेच्छा देण्याचा हा प्रत्रप्रपंच..! 

नमस्कार चांद्रयान मित्रा, चांद्रयान मित्रा तू सावकाश आणि सुखरूप जा चंद्रावर. चांद्रयान ही भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इसरो) द्वारे प्रक्षेपित केलेली पहिली चंद्र शोध मोहीम होती. या मोहिमेला चांद्रयान असे नाव देण्यात आले होते. चांद्रयान हे नाव व्यक्तीच्या नावावर नाही. तर चांद्रयान हे नाव संस्कृत शब्दापासून आले आहे. चंद्र म्हणजे चंद्र आणि यान म्हणजे वाहन कींवा क्राफ्ट. चांद्रयान या नावाचे भाषांतर इंग्रजीमध्ये मून व्हेईकल कींवा मून क्राफ्ट असे केले जाते. हे चंद्राला सांगायला विसरून जाऊ नकोस. चांद्रयाना तुझा चंद्राच्या दिशेने प्रवास १३ जुलै २०२३ ला सुरू झालेला आहे. तुझ्या हॅप्पी जर्नी साठी आम्हा कोट्यावधी भारतीयांच्या अनंत शुभेच्छा..! 

२३ ऑगस्ट २०२३ ला एकदा का तू चंद्रावर सावकाश उतरलास की, चंद्राला सांगायला विसरू नकोस तू स्व-प्रकाशित नसतानाही आम्हा भारतीयांच आयुष्य प्रकाशमान करून टाकलसं. आम्ही लहान बाळ असताना तुझ्याकडे पाहुनच चांदोमामा चांदोमामा जेवलास का गीत गात गात जेवण करीत होतो. चांद्रयाना तू चंद्राला सांग आमच्या भारतातील कितीतरी प्रियकराला हवा हवासा वाटतोस. प्रियकर-प्रियसींना प्रेम करण्यासाठी तू एक माध्यम हवा आहेस. त्याला हे ही सांग की तू एवढा सुंदर आहेस की, प्रियकराने तुझी केवळ उपमा दिली तरी ही आमच्या इथल्या सौंदर्यवतींचा प्रेम, आनंद द्विगुणित होते. आणि अभिमानाने मन प्रसन्न होत असते. त्याला हे तर आवर्जून सांग की आमच्या इथल्या कितीतरी लेकरांचा तू चांदोमामा आहेस. तुझ्या कडे पाहून आमचा अरबी समुद्र अमावस्येला ओहोटीचे व पौर्णिमेला भरतीचे रूप धारण करतो. तुझ्या कडे पाहून आमच्या कडे कोजागिरी सुध्दा करतात. त्याला हे ही सांग तुझ्या कडे पाहून आमचे मुस्लिम बांधव ईद साजरी करतात. आमच्या कुंडली शास्त्रानुसार तू ज्या क्रमांकाच्या स्थानात असतोस त्या क्रमांकाची रास ही आमची जन्म रास असते. तुझ्या जन्म राशीवरून आमचा नामकरण व अक्का आयुष्य काढत असतो. चंद्राला हे सांगायला चांद्रयान मित्रा मुळीच विसरू नकोस.

आजपासून बरोबर पंधरा वर्षांपूर्वी २२ ऑक्टोबर २००८ रोजी सकाळी ६-२२ वाजता भारतातील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ संशोधन केंद्रातून चांद्रयान-१ प्रक्षेपित करण्यात आले होते. ८ नोव्हेंबर २००८ रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ४-५० वाजता चांद्रयान-१ चे चंद्राच्या कक्षेत प्रवेश यशस्वीरीत्या पूर्ण झाले. चांद्रयान-१ या मोहीमेचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. मायस्वामी अन्नादुराई होते. त्यांनी चांद्रयान-१ चे प्रकल्प संचालक म्हणून, एक प्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि अभियंता आहेत. त्यांनी भारताच्या अंतराळ कार्यक्रमात महत्वपूर्ण योगदान दिले आहे. हे ही सांगायला चांद्रयान मित्रा विसरू नकोस. चार वर्षापूर्वी ६ सप्टेंबर २०१९ रोजी विक्रमला घेऊन जाणारी चांद्रयान-२ मोहीम राबवली होती. ती यशस्वी ठरली कींवा अपयशी ठरली अस म्हणता येणार नाही पण त्यामध्ये असणाऱ्या विक्रमशी संपर्क तुटला आणि भारताचा नाव रोशन करू शकणारा विक्रम थोडक्यात हुकला. 

चांद्रयान-२ लॅंडरची वैज्ञानिक मुख्य उद्दिष्ट म्हणजे चंद्राच्या भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास, खनिज विज्ञान, मुलभूत प्रमाणात असणे, चंद्राच्या दक्षिण धृवीय प्रदेशातील पाण्याचे बर्फ आणि पृष्ठभागावर रेगोलिथची जाडी यांचा अभ्यास करणे, चंद्राच्या पृष्ठभागावर नकाशा तयार करणे आणि तिचे ३ डी नकाशे तयार करण्यात मदत करणे हे होते हे मित्रा सांगायला विसरू नकोस. मात्र यावेळी अपयशाची सर्व शक्यता गृहीत धरून संरचना करण्यात आली आहे. त्यामुळे तू मोठ्या आत्मविश्वासाने मार्गक्रमण कर. तुझ्या मागे आम्हा भारतीय अंतराळ संशोधन संस्थील शास्त्रज्ञांची मेहनत व १४० कोटी भारतीयांनी त्यांच्या श्रध्दास्थाना समोर केलेल्या अनंत प्रार्थना तुझ्या पाठीशी उभ्या आहेत. या पृथ्वीची कक्षा ओलांडल्यानंतर नक्की लक्षात ठेव मित्रा. भारतीयांच्या नव्हे तर संपूर्ण जगातील मानवाच्या तुझ्या कडून अपेक्षा ठेवल्या आहेत चांद्रयान-३ मित्रा. चांद्रयाना मागणी वेळी तू चंद्रावर ५०० मीटरच्या चौकोनात उतरशील अशी संकल्पना करून आम्ही तयारी केली होती. 

यावेळी मात्र तुझ्या स्वागतासाठी साधारणता चार कीमी आडवा आणि अडीच कीमी उभा चौकौन चंद्रावर सुनिश्चित तयार करण्यात आला आहे. मागील वेळी तुझी गती कमी करताना प्रचंड प्रमाणात उलथापालथ झाली आणि संपर्क तुटला. यावेळी मात्र तुझा पाऊल सावकाशपणे चंद्रावर पडेल. अशी आम्हा भारतीयांना आशा आहे. चंद्राच्या दिशेने आगेचुक करताना तुझ्या आत काहीही गडबड होऊ नये आणि तू सावकाशपणे गती कमी करत करत चंद्रावर प्रवेश करावास यासाठी संशोधकांनी प्रचंड मेहनत घेतली आहे. अनेकदा चाचणी करून बघितले आहे. विशेष म्हणजे काही कारणाने ठरलेल्या जागी तू उतरलास नाही तरी ठरलेल्या परिघात पर्यायी व्यवस्था तुझ्यासाठी निश्चित करून ठेवली आहे. 

यावेळी तू काही चिंता करू नकोस तुझ्या कडून यावेळी खुप अपेक्षा आहेत. यावेळी नीट जा रे बाबा चांद्रयान मित्रा..!

आम्हा भारतीयांना तुझ्याकडून प्रचंड आशा, अपेक्षा आहेत आणि त्या आशा, अपेक्षा साठी आम्ही सर्वतोपरी केली आहे. तब्बल तीन हजार नऊशे कीलोचे वजन असलेला तू २३ जुलै रोजी दुपारी २ वाजून ३५ मिनिंटानी भारतीय अंतराळ संशोधन संस्था आंध्रप्रदेशातील श्रीहरीकोटा येथील केंद्रावरून उड्डाण घेतलास. तिन हजार नऊशे कीलो वजन घेऊन गुरुत्वाकर्षण शक्तीच्या विरुद्ध पृथ्वीची कक्षा ओलांडून चंद्राच्या दिशेने झेपवणारा तू तब्बल चाळीस दिवसांच्या प्रवासानंतर २३ ऑगस्ट २०२३ रोजी चंद्राच्या पृष्ठभागाला स्पर्श करशील. भलेही त्यावेळी तुझ्यासोबत कोणी सजीव नसेल पण सजीवासमान प्रबळ असणाऱ्या १४० कोटी भारतीयांच्या शुभेच्छा असतील. तुला आव्हानांच्या प्रसंगात पुढे पुढे जाण्याचे समर्थ लाभो. 

चांद्रयान-३ तू चंद्रावर फक्त एक यंत्र घेऊन जात नाहीस तर भारतीयांच्या हळुवार भावना घेऊन जात आहेस. चंद्राला सांग तू चंद्र नाहीस. तू एक भारतीयांसाठी विश्व आहेस. तू पृथ्वीपासून तीन लाख चौऱ्याऐंशी हजार चारशे किलोमीटर दूर असलास तरीही तू आम्हा प्रत्येक भारतीयांच्या एवढा जवळ आहेस की तू आमचा भावविश्व आहेस. तूझा आमचा एक सदैव नाता आहे. आम्ही तुला देव मानतो. सदैव तुझी आरती करत असतो. चांद्रयाना तुला मनापासून शुभेच्छा! मित्रा चंद्राच्या दिशेने खुशाल जा आणि सांग चंद्राला मी जगातील त्या भारत देशातून आलो आहे की जिथे वेगवेगळ्या जातीचे, धर्माचे, पंथाचे लोक गुण्यागोविंदाने एकोप्याने राहतात. सर्व सण उत्सव मिळूनमिसळून करतात. या देशात समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य घडविण्याचा प्रयत्न करतात. विविधतेत एकता हे ज्या देशाचे सुत्र आहे त्या देशातून मी आलो आहे आणि अशा देशातून माणसांनी पाठविलेले एक यंत्र चंद्रावर उतरत असल्याचा तुलाही अभिमान वाटू दे. मी चंद्राच्या दक्षिण धृवावर उतरून भारतीयांच्या आशा पूर्ण करीत आहे याचा नक्कीच तुला अभिमान वाटेल. भारतीय अंतराळ संशोधन केंद्राने ही मोहीम हाती घेतली आहे. चंद्राच्या दक्षिण गोलार्धात प्रथमच भारत देशाकडून प्रत्यक्ष चांद्रयान-३ उतरण्यात येत आहे. 

या मोहिमेतून फक्त भारतच नाही तर चंद्रा विषय संपूर्ण जगातील मानव जातीला असणारे ज्ञान वृध्दिंगत करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. चांद्रयान या मोहिमेचा उपयोग भविष्यातील अवकाश संशोधनासाठी नव्या पिढीला प्रोत्साहित करण्यासाठीही होणार आहे. चंद्रावर पहिला पाऊल निल आर्मस्ट्राँग यांनी ठेवले. यापुढे यांच्या सारखे अनेक मानव जात चंद्रावर वास्तव्य करेल हे ही सांगायला मित्रा विसरू नकोस. हॅप्पी जर्नी चांद्रयान-३ मित्रा..! 

संकलक : श्री सुरेश रामचंद्र चुधरी, जि. प. उ. प्रा. केंद्र शाळा राजाराम

संपर्क : ९४२१७३५६९१





  Print






News - Editorial




Related Photos