वीजवापराचे गणित समजून घ्या , वीजवापर होईल सुरक्षित


- महावितरणचे आवाहन 
प्रतिनिधी / गडचिरोली :
उन्हाचा कडाका वाढला असून सर्वत्र कुुलर्स, पंखे,एसी इत्यादी थंडावा देणाऱ्या उपकरणांचा वापर सहाजिकच वाढला आहे. पूर्वीच्या तुलनेत आज आपल्या अनेक गरजा व दैनंदिन कामे विजेच्या उपकरणावरच अवलंबून आहेत ही वस्तुस्थिती आहे. प्रत्येक घरी विद्युत उपकरणांची यादी वाढतच आहे व वाढतच जाणार आहे व त्यात रोज नवनवीन विद्युत  उपकरणाची भर पडत आहे. मात्र हे उपकरणे वाढली  व त्याचा वापर वाढला की, विजेचे बीलही वाढत जाणारच.  मग विचार येतो वीजवापर कमी करून वीजबिल वाचवता येवू शकले असते काय? किंवा वीजवापराच्या प्रमाणातच आपल्याला वीजबिल आले आहे हि शंका उपस्थित होते व याची चाचपणी केल्या जाते. यात वीजेचा वापर कमी व नीट केल्यास वीजबिलात बचत होणे शक्य आहे तर वीजवापराच्या प्रमाणात वीजबिल आले किंवा नाही या शंकेचेही उत्तर वीजउपकरणांच्या वॅटेज व त्यांच्या एकंदरीत तासांत झालेला वापर यावरून सहजरीत्या काढणे शक्य आहे. वीजउपकरणाचे वॅटेज गुणीला एका दिवसात वापरलेले तास गुणीला महिण्याचे एकंदरीत दिवस भागीला १००० म्हणजे आपण खर्च केलेले वीजेच युनिट हे साधे गणित आपला महिण्याचा एकंदरीत वीजवापर काढून देते.
उदा. आपल्या घरी असलेल्या वीजेच्या एका पंख्याचे वॅटेज हे साधरणतः ६०  वॅट असते व त्याचा वापर दिवसाला जर २० तास गृहित धरला तर,  ६० वॅट गुणीला २० तास बरोबर १२०० वॅट हा एका दिवसाचा वापर झाला. त्याला एका महिण्यातील दिवसांनी गुणले तर महिण्याचा वापर निघणार म्हणजे १२०० वॅट गुणीला ३० दिवस बरोबर ३६०० वॅट म्हणजे ३६ किलोवॅट म्हणजेच ३६ युनिट

गणितीय सुत्रात हे असे असेल,

६० वॅट X  २० तास X   ३० दिवस = ३६००० वॅट किंवा ३६ किलोवॅट
(३६००० वॅट भागिला १००० म्हणजे ३६ युनिट)

         वीजेच्या उपकरणाचे जेवढे वॅटेज कमी व तासात वापर कमी तेवढे कमी वीजेची खपत होणार. पंखे व कुलर्स यांचा वापर उन्हाळयात जास्त असतो. त्यामुळे वीजबिल जास्त येण्यात हे सर्वात महत्वाचे उपकरणे असतात. परंतु यांच्या वापरातही व्यवस्थित वापराने वीजेची खपत कमी होण्यास वाप असते. जसे कुलर्स(डेझर्ट) एकदम उन्हात न ठेवता सावलीत असले म्हणजे कमी पाणी व पर्यायाने कमी वेळात जास्त जागा थंड करून कुलर्सचा वापर कमी होण्यास मदत करणार व त्यामुळे वीजबिलही सहाजिकच कमी होणार.
       पंखे जर स्लॅबच्या घरात स्लॅब च्या वर बांधकाम नसेल तर ते स्लॅब उघडे पडून जास्त तापणार व पंखाही गरम हवा फेकणार परंतु अशा ओपन स्लॅबवर जर ग्रिन नेट लावली तर स्लॅब जास्त गरम होणार नाही व पंखाही गरम हवा फेकणार नाही. 
       ज्यांना एसीचा वापर परवडतो असे लोक आता एसीही वापरू लागले आहेत. सहाजिकच त्यांचे विजेचे बिल मोठे असते. एसी १ टन साधारणत १००० ते १५०० वॅटचे असते त्यामुळे यांचा वापर एका तासात किंबहून ४५ मिनीटातच एक युनिट पडतो. त्यामुळे दिवसाला १० ते १५ युनिट एका दिवसात एक एसी घेतो. परंतु यातही सेव्ह मोड वर ठेवल्यास व रूम नीट हवाबंद असली व रूमचे छत सुर्यप्रप्रकाशात  उघडे नसले तर रूम लवकर थंड होणार व वीज कमी लागणार. तसेच एसीचे आउटडोअर युनिट सावलीत ठेवावे. फ्रिज गरम हवा फेकत असते त्यामुळे ते नीटपणे कुल्रिंग करण्यास भिंतीपासून एक फूट अंतरावर ठेवावे. पंखे इलेक्ट्रानिक रेग्युलेटर्स लावून कमी स्पीडवर ठेवल्यासही वीज वाचते. कुलर्सचे वॅटेज कुलर्सचा पंखा व पाणी फेकणारी मोटार असे एकंदरीत ४००/ ५०० वॅटच्या आसपास असते. त्यामुळे दोन किंवा तीन तासातच मोठे डेझर्ट कुलर्ससुध्दा एक युनिट जाळतात. टीव्ही स्टॅंडबाय मोड वर ठेवू नये. फ्रिज व एसीच्या काॅईल साफ करणे, फ्रिजमध्ये एलईडी बल्बचा वापर करावा. त्यामुळे वीजवापरात बचत होते. विजेची उपकरणे त्याचा वॅट व त्याचा दैनंदिन वापर जाणून घेण्यासाठी अनेक संकेतस्थळे व ॲप आहेत त्यावर जाऊन आपण आपल्या घरात असणारी उपकरणे, त्याचा असलेला वँट व संख्या,आणि उपकरणाचा दिवसातील वापराचे तास ही माहिती टाकल्यास आपले महिन्याला होणारा एकूण युनिट वापर व वीज बिलाची अंदाजीत रक्कम याची माहिती आपण प्राप्त करू शकता.त्याचबरोबर आपल्या वीज बिलाच्या मागे असलेल्या वर्गवारीनिहाय वीज देयकाचे प्रती युनिट दर दिलेले असतात त्यामध्ये १ ते १०० , १०० ते ३०० व ३०० ते ५०० व ५०० ते १००० युनिट संदर्भातील दर छापलेले असतात. त्याचा संदर्भ घेवून वीजवापराचे गणित सोडवता येते.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-04-08


Related Photos