महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


२० जुलै महत्वाच्या घटना

१४०२ : तैमूरलंगने तुर्कस्तानमधील अंकारा शहर जिंकले.

१८०७ : निकेफोरे नीएपस यांना जगातील पहिल्या इंजिनसाठी पेटंट दिले गेले.

१८२८ : मुंबापूर वर्तमान हे मराठी वृत्तपत्र मुंबईत सुरू झाले.

१८७१ : ब्रिटिश कोलंबिया हा प्रांत कॅनडात विलीन झाला.

१९०३ : फोर्ड मोटर कंपनीतून पहिली मोटारगाडी बाहेर पडली.

१९०८ : बडोद्याचे महाराज सर सयाजीराव गायकवाड (तिसरे) यांच्या पुढाकाराने बँक ऑफ बडोदा ची स्थापना झाली.

१९२६ : मेथॉडिस्ट चर्चने स्त्रियांना धर्मगुरू होण्याची परवानगी दिली.

१९४४  : दुसरे महायुद्ध – क्लाऊस व्हॉन स्टाऊफेनबर्गने केलेल्या प्राणघातक हल्ल्यातुन अ‍ॅडॉल्फ हिटलर बचावला.

१९४९ : इस्त्रायल व सीरीयाने शांतता करार केल्यामुळे १९ महिने सुरू असलेले युद्ध संपले.

१९५२ : फिनलंडची राजधानी हेलसिंकी येथे १५ व्या ऑलिम्पिक खेळांना सुरूवात झाली.

१९६०  : सिरिमावो भंडारनायके श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी.

१९६९ : नील आर्मस्ट्राँग हा चंद्रावर पाऊल ठेवलेला पहिला मानव ठरला.

१९७३ : केनियाचे अर्थमंत्री ज्युलियस कियानो यांनी जाहीर केले की देशातील आशियाई लोकांचे उद्योग-धंदे वर्षअखेरीस सक्तीने बंद करण्यात येतील.

१९७६ : मंगळावर प्रथमच व्हायकिंग-१ हे मानवरहित अंतराळयान उतरले.

१९८९ : म्यानमारच्या सरकारने ऑँग सान सू कीला नजरकैदेत टाकले.

२००० : अभिनेते दिलीपकुमार यांना राजीव गांधी राष्ट्रीय सद्‌भावना पुरस्कार जाहीर.

२०१५: पाच दशकांनंतर अमेरिका आणि क्युबा यांच्यामध्ये राजनयिक संबंध पुन्हा सुरू झाले.

१९२४  : बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना.

२० जुलै जन्म

३५६ : ३५६ई.पूर्व: मॅसेडोनियाचा राजा अलेक्झांडर द ग्रेट यांचा जन्म. (मृत्यू: ११ जून ख्रिस्त पूर्व ३२३)

१८२२ : जनुकांची संकल्पना मांडणारा जर्मन जीवशास्त्रज्ञ ग्रेगोर मेंडेल यांचा जन्म. (मृत्यू: ६ जानेवारी १८८४)

१८३६ : ज्वरमापीचा शोध लावणारे डॉक्टर सर थॉमस क्लिफोर्ड ऑलबट यांचा जन्म. (मृत्यू: २२ फेब्रुवारी १९२५ – केंब्रिज, केंब्रिजशायर, इंग्लंड)

१८८९ : बीबीसी चे सहसंस्थापक जॉन रीथ यांचा जन्म. (मृत्यू: १६ जून १९७१)

१९११ : भारतीय क्रिकेट खेळाडू बाका जिलानी यांचा जन्म.

१९१९ : माउंट एव्हरेस्टवर सर्वप्रथम चढाई करणारे न्यूझीलंडचे गिर्यारोहक सर एडमंड हिलरी यांचा जन्म. (मृत्यू: ११ जानेवारी २००८)

१९२१ : बनारस घराण्याचे नामवंत तबलावादक पंडित सामताप्रसाद यांचा जन्म. (मृत्यू: ३१ मे १९९४)

१९२९ : हिन्दी चित्रपट अभिनेता राजेंद्रकुमार यांचा जन्म. (मृत्यू: १२ जुलै १९९९)

१९७६ : भारतीय क्रिकेट खेळाडू देबाशिष मोहंती यांचा जन्म.

२० जुलै मृत्यू

१९२२ : रशियन गणितज्ञ आंद्रे मार्कोव्ह यांचे निधन.

१९३७ : रेडिओचे संशोधक गुग्लिएल्मो मार्कोनी यांचे निधन. (जन्म: २५ एप्रिल १८७४)

१९४३ : कादंबरीकार, साहित्य समीक्षक आणि तत्त्वचिंतक वामन मल्हार जोशी यांचे निधन. (जन्म: २१ जानेवारी १८८२)

१९५१ : जॉर्डनचा राजा अब्दुल्ला (पहिला) यांचे निधन.

१९६५ : क्रांतिकारक बटुकेश्वर दत्त यांचे निधन. (जन्म: १८ नोव्हेंबर १९१०)

१९७२ : अभिनेत्री गीता दत्त यांचे निधन. (जन्म: २३ नोव्हेंबर १९३०)

१९७३ : अमेरिकन अभिनेता आणि मार्शल आर्ट तज्ज्ञ ब्रूस ली यांचे निधन. (जन्म: २७ नोव्हेंबर १९४०)

१९९५ : शास्त्रीय गायक शंकरराव बोडस यांचे निधन. (जन्म: ४ डिसेंबर १९३५)

२०१३ : भारतीय राजकारणी खुर्शिद आलम खान यांचे निधन. (जन्म: ५ फेब्रुवारी १९१९)





  Print






News - todayspecialdays




Related Photos