कुरखेडा येथील शिवकृपा पतसंस्थेच्या गुंतवणूकदारांचा खा.नेते यांच्या प्रचार कार्यालयात राडा


- कुलूप ठोकले, प्रचार कार्यालय पडले ओस 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / कुरखेडा :
खासदार अशोक नेते अध्यक्ष असलेल्या  शिवकृपा नागरी सहकारी पतसंस्थेत रक्कम गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांनी रक्कम परत करण्यास   विलंब होत असल्याने संतप्त होत काल बुधवार ३ एप्रिल रोजी    सांयकाळी खा.नेते यांच्या कुरखेडा  येथील प्रचार कार्यालयात राडा केला.    काही इसमानी प्रचार साहीत्याची मोडतोड करीत कार्यालयाला कूलूप ठोकले . आजही दिवसभर हा कूलूप उघडण्यात न आल्याने येथील खा.अशोक नेते यांची प्रचार यंत्रणा ठप्प पडली होती. 
 येथील शिवकृपा सहकारी पतसंस्थेच्या  शाखेत शहर व ग्रामीण भागातील गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे.  मात्र एक ते दिड महिण्यापासून या शाखेचा व्यवहार ठप्प पडला आहे.  दैनिक वसूली सूद्धा थांबविण्यात आलेली आहे.  त्यामूळे गुंतवणूकदार ग्राहकात संभ्रम निर्माण झाला व त्यांनी  संस्थेकडे आपली गुंतवणूक परत मिळविण्यासाठी  तगादा लावला.  मात्र संस्थेकडून चुकारे वितरणात विलंब होत असल्याने शंका निर्माण झाली होती.  दरम्यान एक महिण्यापूर्वी संस्थेचे प्रमूख खा.नेते यानी कूरखेडा येथे भेट देत गुंतवणूकदारांशी चर्चा केली व त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला.  यावेळी चर्चे दरम्यानही मोठी तणावपूर्ण परीस्थीती निर्माण झाली होती.  यावेळी सर्व गुंतवणूकदारांचे पैसे १५ दिवस ते एक महिण्याच्या  कालावधीत परत करण्याचे आश्वासन खा.  नेते यांनी  दिले होते.  मात्र वारंवार मुदत  देउनही विलंब होत असल्याने मागील तिन दिवसापासून दोनशे ते तिनशे च्या  संख्येत असलेले गुंतवणूकदार येथील प्रचार कार्यालयात सकाळपासून ठिय्या मांडत होते . काल परिस्थिती  अधिक चिघळल्याने काही इसमांनी  प्रचार साहित्याची  मोडतोड करीत कार्यालयाला कूलूप ठोकले.  आज गुरुवार रोजी सूद्धा हा कूलूप न उघडल्याने दिवसभर प्रचार कार्यलय बंद होता व प्रचार यंत्रणा ठप्प पडली होती.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-04-04


Related Photos