महत्वाच्या बातम्या

 आम आदमी पार्टी ची मुख्याधिकारी विरोधात जिल्हाधिकाऱ्यंना तक्रार


- प्रकरण : नगरपरिषद च्या शाळेत शिक्षणाचा बाजारीकरण

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / बल्लारपुर : नगरपरिषद च्या शाळेत प्री-स्कूल इंग्रीजी माध्यम च्या नावाने शिक्षणाचे बाजारीकरण करत असलेल्या बल्लारपुर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी विरोधात आम आदमी पार्टी बल्लारपुर ने  जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांना १३ जुलै २०२३ निवेदनाद्वारे तक्रार करण्यात आली.

शिक्षणाचे बाजारीकरणाचा ठेका रद्द करा अशी मागणी देखील करण्यात आली.  बल्लारपुर नगरपरिषद शाळेत एक ही इंग्रजी माध्यमाची शाळा नाही आहे. शहरातील खाजगी शाळा संचालक नगरपरिषद शाळांकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांचा ओघ स्वतः च्या खाजगी शिक्षण संस्थेकडे स्थानांतरीत करू शकतो. लक्की ड्रा न करता सर्व BPL धारक व इतर विद्यार्थ्यांना सुद्धा मोफत शिक्षण देने नगरपरिषदेचे कर्तव्य आहे. कोणतेही जनप्रतिनिधी नसतांना शिक्षणाच्या या बाजारीकरणाचा निर्णय नगरपरिषद कसे काय घेऊ शकते? 

नगरपरिषदेच्या या निर्णयाकडे लक्ष द्या व शिक्षण कंत्राट पद्धतीने देने गरजेचेच असेल तर एखाद्या निस्वार्थ शिक्षण क्षेत्रात काम करणयास इच्छुक NGO ला हे कंत्राट द्यावे. शहरातील चिमुकल्यांच्या भवितव्यासाठी उच्चस्तरीय मोफत शिक्षणाचा संविधानिक अधिकार नगरपरिषदेच्या शाळेत मिळावे यासाठी आम आदमी पार्टी सातत्याने प्रयत्न करत आहे. बल्लारपुर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आणि संबंधित अधिकारी दुर्लक्ष करून कंत्राटदाराशी संगमत करून शिक्षणाचा व्यापार चालविण्याचे कारस्थान स्पष्ट दिसत आहे.

या विषयावर लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावे आणि झालेल्या निर्णयाची सत्यप्रत आणि आमच्या प्रश्नांचे उत्तर लिखित स्वरूपात देण्याची मागणी केली. यानंतर संविधानिक रित्याने आंदोलन तीव्र करणार असून त्याचे जबाबदार नगरपरिषदचे मुख्याधिकारी आणि संबंधित अधिकारी राहतील असे निवेदनात म्हटले.

यावेळी शहराध्यक्ष रविकुमार पुप्पलवार, जिल्हा संघठन मंत्री प्रा. नागेश्वर गंड़लेवार व भिवराज सोनी,  सचिव संतोष दोरखंडे,  शहर उपाध्यक्ष गणेश सिलगमवार व अफ़ज़ल अली, सचिव ज्योति बाबरे, सहसचिव आशीष गेड़ाम, महिला अध्यक्ष किरण खन्ना, सचिव शीतल झाडे, यूथ अध्यक्ष सागर कांबळे, बस्ती विभाग अध्यक्ष प्रा. तुषार डोंगरे, टेकडी विभाग अध्यक्ष राजू शिंदे, सतीश श्रीवास्तव, आनंद चहारे, अतुल मडावी आणि इत्यादि उपस्थित होते.





  Print






News - Chandrapur




Related Photos